कुटुंबाने भाजीपाला शेतीत साधली प्रगती,जाणून घ्या त्यांची पीक पद्धत,व्यवस्थापनातील बाबी….

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर (ता.शिरोळ) येथील राजपूत कुटुंबाने एकी जपण्याबरोबर अनेक वर्षापासून विविध भाजीपाला पिके या पद्धतीत सातत्य ठेवले. त्यामध्ये हस्तगत कौशल्य केले. बाजारपेठेत त्यांच्या शेतमालाचा दर्जेदार ब्रँड तयार झाला आहे. शेतीसह उल्लेखनीय कौटुंबिक प्रगती याच शेतीतून कुटुंबाने साध्य केली आहे.

भाजीपाला पिकांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका प्रसिद्ध आहे. गुणवत्ताप्राप्त उत्पादनातून आपली वेगळी ओळख येथील भाजीपाला उत्पादकांनी निर्माण केली आहे. जयसिंगपूर तालुक्यात संजय रजपूत यांच्या कुटुंबाची सहा एकर शेती आहे. याशिवाय त्यांनी आणखीन तीन एकर शेती दुसऱ्या शेतकऱ्यांकडील करण्यास घेतली आहे. या कुटुंबाला वर्षांपासून भाजीपाला शेतीचा मोठा अनुभव आहे. कुटुंब हे घरच्या सदस्याचे अखंड परिश्रम व पीक फेरपालट या बाबीच्या जोरावर शेतीत भक्कमपणे पाय रोवून उभे आहे. शेतीचे कामकाज हे संजय यांचे वडील तुकाराम यांच्या मार्गदर्शनाखाली होते. सध्या एक एकरात टोमॅटो, दीड एकरात फ्लावर, चार एकरात ऊस अशी लागवड आहे.

अशी आहे पीक पद्धती

सहा एकर शेतीचे दोन भाग केले असून त्यापैकी तीन एकरात उसाची लागवड केली आहे. खोडवा न राखता फक्त लागवडीचा ऊस घेतला जातो.  भाजीपाला पिकांसाठी फेब्रुवारी मार्च दरम्यान ऊस तुटून गेला की पूर्ण नांगरट करून एक ते तीन एकरापर्यंत क्षेत्र तयार केले जाते. नियमित घेतली जाणारी पिके म्हणजे टोमॅटो ,फ्लावर ,काकडी आदी आहे. त्यामध्ये ठिबक सिंचन व पॉली मल्चिंग यांचा वापर केला जातो. त्यामुळे पाण्याची बचत होऊन रस शोषक किडींवर नियंत्रण मिळवण्यात यश येते. भाजीपाला पिकांचा प्लॉट साधारणत: सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत संपतो. त्यानंतर या शेतात उसाची लागवड केली जाते. त्यात फ्लावर हा आंतरपीक म्हणून घेतला जातो.

व्यवस्थापनातील बाबी

भाजीपाला पिके म्हटले किडी-आलेच पण कीडनाशकाचा कमीतकमी वापर रजपूत कुटुंब करते. ठिबक सिंचनाद्वारेच बहुतांशी खते दिली जातात. कुंपनलिंकांच्या पाण्याचा वापर जपून करण्यात येतो. विविध वाण्यांचा चांगला अभ्यास हा भाजीपाला पिकांचा अनेक वर्षापासूनचा अनुभव तयार झाल्याने झाला आहे. सातत्याने वाण बदल हा बाजारपेठेची मागणी ओळखून करण्याचा प्रयत्न असतो. रोगप्रतिकारक क्षमता, पिकाचा कालावधी, एकरी उत्पादकता या बाबींना वाहनांची निवड करताना प्राधान्य दिले जाते. भाजीपाला पिके हे तज्ञ व्यक्तीच्या व कृषी सेवा केंद्र व्यक्तीच्या मार्गदर्शनातून यशस्वी करण्याचा प्रयत्न असतो.

तांबडी व काळी अशा पद्धतीच्या दोन जमिनी आहे. एक ते दोन वर्षातून माती परीक्षण हे ऊस व भाजीपाला या दोन्ही प्रकारच्या पिकांमध्ये अन्यद्रवाच्या संतुलित वापर व्हावा यासाठी केले जाते. आळवणी, सेंद्रिय सलरी , गांडूळ खत व शेणखत प्रत्येक वर्षी जमिनीला यांचा वापर केला जातो. 70 तनापर्यंत उसाचे एकरी उत्पादन मिळते. वर्षाला दहा लाख पुढे उत्पन्न हे सहा एकरांमध्ये उसासहित भाजीपाला पिकांमधून मिळते. केळी बाग बेवड म्हणून गेल्या वर्षी घेतली होत आहे.

तयार केलेला भाजीपाल्यांचा ब्रॅण्ड

बाजारपेठेत रजपूत यांच्या शेतमालाला नेहमीच चांगला दर मिळण्याचे कारण त्यांचे दर्जा, पॅकिंग याबाबत काटेकोरपणा असणे. ‘टीजीआर’असे लेबल मालाच्या प्रत्येक गोणीवर त्यांनी केलेले आहे. भाजीपाला व्यापाऱ्यांकडे या नावाने संबंधित पोचला की तो तपासून पाण्याची गरज भासत नाही. व्यापाराकडून जादाचा किलोला आवर्जून एक ते दोन रुपये जादा दर दिला जातो. रजपूत याने मुंबईसह अहमदाबाद पर्यंत अशाप्रकारे आपल्या नावाचा ब्रॅण्ड तयार केला आहे.

शेतीत साधली प्रगती

भाजीपालांचे क्षेत्र कमी दरांमुळे अलीकडील काळात कमी होत आहे. कमी दराचा फटका रजपूत कुटुंबांनाही अनेकवेळा बसला. पिक काढून टाकण्याची वेळ अनेकदा आली. त्यांनी कधीच मात्र भाजीपाला पिकांपासून घेतली नाही. सातत्य हीच बाब कोणत्याही गोष्टीत महत्त्वाची मानली. एकेकाळी भाजीपाला उत्पादन हे संजय यांची आजी घ्यायची. त्यांची विक्री स्वतः डोक्यावरून वाहून नेऊन करायची. आर्थिक प्रगती ही कुटुंबातील तुकाराम व रतन सिंग या दोन भावांनी शेतीवरील निष्ठा कायम ठेवत साधली.

क्षेत्राचा विस्तार हा वीस वर्षात एक एकरापासून ते सहा एकरापर्यंत केला. दोन टुमदार घरे उभारण्यात आले व चार चाकी गाडी घेतली. रतनसिंग आज हयात नही.या कुटुंबातील सर्व सदस्य शेतीत स्वतः राबतात जस की संजय त्यांच्यासहित वडील तुकाराम, आई गंगुबाई, पत्नी श्रुती, काकू कुसुम, चुलत भाऊ राजाराम व त्याची पत्नी सविता. कुटुंबातील सर्व सदस्य हे मशागती पासून ते फवारणी, पाणी व्यवस्थापन, खत, काढणी या सर्व कामात दरवेश झाले आहेत. मजुरांवरील अवलंबित्व  राणे कमी केले असून त्यावर होणारा खर्चात मोठी बचत केली आहे.

Leave a Reply