मोठ्या प्रमाणावर पावसाचा सध्या महाराष्ट्रामध्ये खंड पडला असून खरिपातील पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. या कालावधीमध्ये पिकांवर विपरीत परिणाम होऊन येणाऱ्या काळात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. अजून देखील पावसाची चिन्हे नसून हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्व दूर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
मात्र पावसाची सुरुवात होईपर्यंत खरिपाचे पिकाची स्थिती अतिशय वाईट होण्याची शक्यता आहे याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक सहभाग नोंदवला आहे शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या जोखमी बाबी अंतर्गत संभाव्य भरपाईतून 25 टक्के आगाऊ रक्कम जमा करण्याच्या बाबतीत राज्यातील काही ठिकाणी हालचाली सुरू झालेल्या असून याच बाबतीत एक महत्त्वाची अपडेट परभणी जिल्ह्यासाठी समोर आले आहे
परभणी जिल्ह्यातील सात तालुक्यातील 11 मंडळांमध्ये 21 ते 22 दिवसांचा सलग पावसाचा खंड
29 जुलै ते 19 ऑगस्ट या कालावधीमध्ये या हंगामातील परभणी जिल्ह्यातील सेलू मानवत पालम जितुर आणि पूर्णा या सात तालुक्यातील जवळजवळ 11 मंडळांमध्ये सलग 21 ते 22 दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे यामुळे सोयाबीनच्या या हंगामातील उत्पादनामध्ये घट दिसून येत आहे
त्यामुळे पंतप्रधान पिक विमा योजनेच्या तरतुदीनुसार मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थितीत या जोखीम अंतर्गत सोयाबीन टीका करिता ज्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे असे शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा भरपाई रकमेतून 25 टक्के गौरक्कम जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तथा पिक विमा योजना जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी 25 ऑगस्टला अधिसूचना काढून कंपनीला दिल्या आहेत
पाहणी अहवाल सादर
पिक विमा योजनेतील मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थितीनुसार भरपाई निश्चित करण्याच्या काही तरतुदी आहेत त्या आता परभणी जिल्ह्यातील आता परभणी जिल्ह्यामधील अधिसूचित विमा क्षेत्र या घटकातील सोयाबीन या अधिसूचित पर्जन्यमान अहवाल,तसेच पिकाच्या पिक परिस्थिती अहवालस्थानिक प्रसार माध्यमांचे वार्तांकन तसेच दुष्काळ सदृश्य परिस्थिती इत्यादी प्रातिनिधिक सूचकांच्या आधारावर आता विमा कंपनी प्रतिनिधी व राज्य शासनाच्या अधिकारीयांनी संयुक्त पाहणी करून अहवाल सादर केला आहे.
या पाहणीमध्ये सिंगणापूर,दैठणा, तसेच सेलू, मानवत तालुक्यातील केकरजवळा, जिंतूर , पाथरी, बाभळगाव, पालम तालुक्यातील रावराजुर, पूर्णा,आणि पेठ शिवणी तालुक्यातील ताडकळस आणि लिमला या अकरा मंडळातील सोयाबीनचे जे काही अपेक्षित उत्पादन आहे ते मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनांच्या तुलनेत 50% पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे आता आयसीआयसीआय लोम्बर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड त्या कंपनीने ही अधीसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत ज्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे , अशा सर्व पिक विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम जमा करावी असे आदेश देखील देण्यात आले आहेत.