पूर्वी घोषणा केल्या प्रमाणे कांदा निर्यातीवरील बंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहे.कांदा निर्यात बंदी उठविलेली नाही ती लागू आहे, असे स्पष्टीकरण मंगळवारी (ता. २०) केंद्रातील एका उच्च अधिकाऱ्याने दिले.
८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने कांदानिर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत निर्यातबंदी घातली होती.सरकारने ‘‘कांदा निर्यात बंदी उठविलेली नाही तर ती लागू आहे,त्यात कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही,’’अशी रोहित कुमार सिंग यांनी माहिती दिली . या मागील सरकारचा मुख्य हेतू ‘‘ग्राहकांना कमी किंमतीत कांदा उपलब्ध व्हावा, हा आहे,’’ असेही ते यावेळी म्हणाले.
रब्बी हंगामात २२.७ दशलक्ष टन कांद्याचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. त्या अनुशंगाने येत्या काही दिवसांत कृषी मंत्रालयाचे अधिकारी महाराष्ट्र,गुजरात , मध्य प्रदेश आणि या प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये रब्बी कांद्याच्या उत्पादन स्थितीचा आढावा घेणार आहेत . दरम्यान,सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मंत्रालय गटाने दिलेल्या मंजुरीनंतर ‘केस-टू-केस’ या आधारावर मित्र देशांत कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली जाते.
निर्यातबंदी उठविल्याच्या वृत्तानंतर दरात वाढ…
निर्यातबंदी उठविल्याच्या बातमीनंतर देशातील सर्वांत मोठी घाऊक कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे घाऊक कांद्याचे दर ४०.६२ टक्क्यांनी वाढून अठराशे रुपये प्रतिक्विंटल झाले आहे .
३१ मार्चनंतरही बंदी उठण्याची शक्यता कमीच..
महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील कांदा पिकाखालील क्षेत्र कमी झाल्यामुळे कांद्याचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे.त्यामुळे कांद्यावरील निर्यात बंदी ३१ मार्चनंतरहीउठवली जाण्याची शक्यता कमीच आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.












