देशातील शेतकरी पीएम किसान च्या पंधराव्या हफ्त्याची वाट बघत आहे. त्यामध्येच आता या लाभार्थ्यांना आणखीन एक गिफ्ट केंद्र सरकारकडून मिळणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पीएम किसान योजनेमध्ये आता शेतकऱ्यांना एक गिफ्ट मिळणार आहे.
केंद्र सरकारने गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत म्हणून पीएम किसान योजना सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे वर्षातून सहा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होते. या योजनेचा पंधरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या योजनेतून सरकारने आणखीन एक शेतकऱ्यांना गिफ्ट देण्याचे जाहीर केले आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान ऋण पोर्टल लॉन्च केले आहे . या पोर्टल द्वारे शेतकरी सहजपणे किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना सबसिडी सह कर्ज सुविधा देखील मिळणार आहेत. शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्ज देण्यासाठी हे पोर्टल तयार केले आहे. शेतकरी शेतीसाठी सावकारांकडून कर्ज घेतात व त्याचे व्याज देखील जास्त असते. त्यामुळे पीएम किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळणार आहे.
1 ऑक्टोंबर 2023 पासून केंद्र सरकार घर घर किसान कार्ड मोहीम सुरू करणार आहे . यावर्षी अखेरपर्यंत ही मोहीम चालणार असून ही मोहीम डिजिटल देखील सुरू राहणार आहे. बँका, पंचायती जिल्हा प्रशासनाला देखील या योजनेत सहभागी केले आहे. पीएम लाभार्थ्यांनाही येत्या तीन महिन्या मध्ये किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे.
किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय..
सरकारने साल 1998 मध्ये किसान क्रेडिट कार्ड ची सुरुवात केली होती. या शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. इतराहून ही कर्ज खूप स्वस्त आहे. या कार्डसाठी देशातील सर्व शेतकरी पात्र आहेत. ही योजना भारत सरकार भारतीय रिझर्व बँक आणि नाबार्डने मिळून सुरू केली आहे.
पीएम किसान च 15 वा हप्ता कधी मिळणार…
देशातील शेतकरी पीएम किसान च्या पंधराव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. या योजनेत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात . दोन हजार रुपयांच्या हप्त्याने ही रक्कम वर्षातून तीन वेळेस मिळते. मीडिया रिपोर्टनुसार शेतकऱ्यांना पंधरावा हप्ता ऑक्टोंबर, नोव्हेंबर या महिन्यांमध्ये मिळू शकतो. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा होणार आहे.