सोयाबीनवर ‘पिवळा मोझक ‘ रोगाचा प्रादुर्भाव, ९० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याचा धोका..

सोयाबीनवर ‘पिवळा मोझक ' रोगाचा प्रादुर्भाव, ९० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याचा धोका..

सोयाबीन पिकावर पिवळा मोजक रोगाचे आक्रमण होताना आढळले आहे या रोगाचे प्रादुर्भावामुळे उत्पादनात 90% पर्यंत घट येण्याचा धोका संभवतो रोगावर नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

पश्चिम विदर्भात खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक क्षेत्रावर झाला आहे सध्याचे परिस्थितीमध्ये सोयाबीन हे पीक फुलरावस्थेमध्ये असून त्यामध्ये बहुतांश ठिकाणी पिवळा मोजत रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे हा रोग मुंगबिक येलो मोजत विषाणू व मुंगी यल्लो मोजा इंडिया या विषाणू प्रजातीमुळे होतो या विषाणूची वाहक पांढरी माशी आहे उबदार तापमान दाट पेरणी नत्राची अधिक मात्रा तसेच शेतीतील तन इत्यादीमुळे रोग वाढण्यास मदत होते.

या रोगासाठी वेळीच नियंत्रण करणे आवश्यक असते या रोगाचे जर संक्रमण पीक फुलोरा होण्याअगोदर झाले असल्यास 90 टक्के उत्पादन घट जाणवू शकते म्हणजेच पेरणीनंतर 75 दिवसापर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास अधिक नुकसान होते परंतु 75 दिवसानंतर संक्रमण झाल्यास फारसे नुकसान संभवत नाही असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात तसेच शेंगांचा आकार लहान राहून यामध्ये दाणे सुद्धा कमी राहतात पानांमधील हरितद्रव्य नाहीसे झाल्यामुळे अन्न निर्मितीमध्ये बाधा निर्माण होऊन उत्पादनात घट होते यावर व्यवस्थापन करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

प्रादुर्भावग्रस्त झाडे काढून ट* गरजेचे आहे पिवळे चिकट सापळे हेक्‍टरी 160 याप्रमाणे लावावेत उन्हाळी सोयाबीन पीक घेऊ नये रस शोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी अंतर प्रभावी कीटकनाशकाची फवारणी करावी पेरणीनंतर 20 ते 35 दिवसांनी निंबोळी अर्काची 5% फवारणी करावी अशा उपायोजना सहाय्यक वनस्पती रोप शास्त्रज्ञ प्राध्यापक राजू घावडे व प्राध्यापक प्रकाश घाटोळ यांनी सुचवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *