
kanda bajar bhav : दिनांक २८ जुलै रोजी सोमवारी कांदा (kanda bajar bhav) लिलावाचा आठवडा सुरू झाला, तेव्हा पहिल्याच दिवशी मागील आठवड्याच्या तुलनेत राज्यातील अनेक बाजारात कांदा दर घसरल्याचे दिसून आले. काल सोमवारी राज्यात एकूण सुमारे ३ लाख १० हजार क्विंटल आवक झाली.
नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची १लाख ६५ हजार क्विंटल, अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे ९० हजार क्विंटल आवक झाली, धुळे जिल्ह्यात १२ हजार क्विंटल आवक झाली. तर सोलापूर जिल्हयात लाल कांद्याची सुमारे १० हजार क्विंटल आवक झाली. नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला सरासरी ११९८, तर अहिल्यानगरमध्ये सरासरी १ हजाराचा प्रति क्विंटलमागे दर मिळाला.
मागील काही दिवसांपासून नाशिकसह राज्यातील बाजारसमित्यांमध्ये कांदा आवक वाढत असून भाव पडण्याच्या अफवा आणि भीतीने हा परिणाम होत आहे. त्यामुळे बाजारावर दबाव वाढून भावही कमी होत आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान सोमवारी लासलगाव बाजारसमितीत उन्हाळी कांद्याला किमान ५०० रुपये कमाल १८०० रुपये आणि सरासरी १२७५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. दुसरीकडे पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत किमान ४०० तर सरासरी १३८० बाजारभाव मिळाला. लोणंद बाजारात सरासरी १ हजार रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजारात सरासरी ११०० रुपये, सांगली बाजारात सरासरी ११५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
राज्यात मंगळवेढा बाजारसमितीत सर्वाधिक कमाल भाव मिळाला. म्हणजेच क्विंटलमागे २१०० रुपये, तर त्या खालोखाल सर्वाधिक कमाल बाजारभाव पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत प्रति क्विंटल २०९० रुपये मिळाला.