Waiting for rain : राज्यात ८८ टक्के खरीप पेरणी; काही विभागांमध्ये पावसाची प्रतिक्षा..

Waiting for rain : दिनांक २१ जुलै २०२५ अखेर महाराष्ट्रात खरीप हंगामात एकूण १४४.३६ लाख हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित पेरणी होती. यापैकी १२७.३९ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झालेली असून, हे प्रमाण सरासरीच्या ८८ टक्के आहे. यामध्ये ऊसाचा समावेश केल्यास राज्यात एकूण १५७.४८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १२८.७८ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ८२ टक्के पेरणी झाली […]
Sugarcane crop : ऊस पिकासाठी शेतकऱ्यांना आता प्रतिहेक्टर १५ हजार रुपयांपर्यंत अनुदान..

sugarcane crop : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उसाच्या लागवडीसाठी सरकारकडून आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट ठेवून “ऊस विकास कार्यक्रम” राबवण्यात येत आहे. यामध्ये ऊस उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक वाणांची लागवड, योग्य तंत्रज्ञानाचा वापर आणि कार्यक्षम साखर कारखान्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शन पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. […]
Crop insurance : पिकविम्याची मुदत ३१ जुलैला संपतेय; तुम्ही काढला का विमा?

Crop insurance : पिकविम्याची मुदत ३१ जुलैपर्यंत असून त्याआधीच शेतकऱ्यांनी विमा उतरवावा असे आवाहन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, रोग व किडीमुळे पिकांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना देशभरात प्रभावीपणे राबवली जात आहे. खरीप २०२५ हंगामासाठी केंद्र आणि राज्य शासनाने ही सुधारित योजना पुन्हा सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पिकाच्या नुकसानीपासून […]
Kanda bajarbhav : राज्यातील या बाजारसमितीत कांदा बाजार भाव दोन हजारपेक्षा जास्त..

kanda bajar bhav : दिनांक २८ जुलै रोजी सोमवारी कांदा (kanda bajar bhav) लिलावाचा आठवडा सुरू झाला, तेव्हा पहिल्याच दिवशी मागील आठवड्याच्या तुलनेत राज्यातील अनेक बाजारात कांदा दर घसरल्याचे दिसून आले. काल सोमवारी राज्यात एकूण सुमारे ३ लाख १० हजार क्विंटल आवक झाली. नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची १लाख ६५ हजार क्विंटल, अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे ९० […]
maharashtra rain alert : राज्यात पावसाचा असा आहे इशारा..

maharashtra rain alert : भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, २९ जुलै रोजी महाराष्ट्रात काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, घाटमाथ्याचे भाग आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांमध्ये सध्या पावसाच्या सरींमुळे जमिनीत आर्द्रता वाढली असून, अधिक पाऊस झाल्यास निचऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. […]
ऊसावरील पांढरी माशी आणि हळदीवरील करपा, या उपायाने घालवा…

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि हवामान सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने दिलेल्या अलीकडील शिफारशीनुसार, मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा साच आणि जमिनीत चिखल निर्माण झालेला आहे. त्यामुळे ऊस आणि हळद या प्रमुख नगदी पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. हळद पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर अति पाऊस झाल्यास मुळांना […]