शेतकऱ्याने सरकारी अनुदानातून उभारले शेडनेट,त्यामध्ये शिमला मिरचीचे उत्पादन घेऊन मिळवला ‘इतक्या’ लाखाचा नफा , पहा सविस्तर

शेतकऱ्याने सरकारी अनुदानातून उभारले शेडनेट,त्यामध्ये शिमला मिरचीचे उत्पादन घेऊन मिळवला 'इतक्या' लाखाचा नफा , पहा सविस्तर

शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाची लागवड आणि व्यवस्थापन केले तर नक्कीच उत्पादन भरघोस मिळतेच, यामध्ये काही शंका नाही.  परंतु जर या भरघोस उत्पादनाला जर चांगल्या बाजारभावची साथ मिळाली तर नक्कीच शेतकरी आर्थिक प्रगती करू शकतात.  तसेच सरकार शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून अनुदान देत असते.

अशा अनेक प्रकारच्या योजनेचा फायदा घेऊन शेतकरी सुलभ शेती करू शकतात.  अशाच एका शेतकऱ्याने सिमला मिरचीच्या शेतीतून भरघोस उत्पन्न व नफा कमवला आहे.  पैठण तालुक्यातील हर्षी या गावची कृष्णा आगळे यांनी शेडनेट उभारून यामध्ये सिमला मिरचीची लागवड केली व भरघोस उत्पादन घेऊन भरपूर नफा देखील मिळवला या शेतकऱ्याची यशोगाथा आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. 

सिमला मिरचीतून पाच लाखाचा नफा

पैठण तालुक्यातील हर्षी या गावचे कृष्णा आगळे यांनी शेडनेटमध्ये जानेवारी महिन्यामध्ये सिमला मिरचीची लागवड केली होती.  शेडनेटमध्ये योग्य वातावरण संतुलन ठेवून लागवडीनंतर दोन महिन्यांमध्येच मिरचीचे उत्पादन सुरू झाले.सुरुवातीला त्यांनी पुणे आणि मुंबई या ठिकाणी मिरचीची विक्री केली.  व गुजरात राज्यातील सुरत पर्यंत त्यांनी मिरची विक्रीसाठी पोहोचवली. 

त्यानंतर बऱ्याच व्यापाऱ्यांनी बांधावर येऊन मिरची खरेदी करण्यास सुरुवात केली .  या सगळ्या बाबीतून त्यांनी सव्वा पाच लाखाचा नफा सात महिन्याच्या आत मिळवला.  त्यांच्याकडे एकूण नऊ एकर शेती असून यामधून मागच्या वर्षी अनुदानावर त्यांनी एक एकर क्षेत्रावर शेडनेट उभारले.  या शेडनेटमध्ये त्यांनी 19 जानेवारीला सिमला मिरचीची लागवड केली. 

या मिरचीच्या व्यवस्थापनामध्ये मजुरांऐवजी त्यांना घरच्यांची जास्त मदत झाली.  हे शेडनेट उभारण्यासाठी त्यांनी नानाजी देशमुख कृषी सहाय्य योजना म्हणजेच पोखरा या योजनेतून 18.15 लाख रुपयांचे अनुदान मिळवले.  आणि स्वतःचा चार लाखाचा खर्च केला असे 22 लाख रुपये खर्च करून त्यांनी शेडनेट उभारले विशेष म्हणजे एका एकर क्षेत्रामध्ये त्यांना नऊ एकर क्षेत्र पेक्षा जास्त उत्पादन मिळाले. 

त्यांच्या मते मोकळे क्षेत्रापेक्षा शेडनेटमध्ये जर शेती केली तर खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.  बाहेरील तापमान जास्त असल्यामुळे मिरचीचे पीक घेता येत नाही.  परंतु शेडनेटमध्ये मिरचीचे पीक खूप चांगल्या प्रकारे व दर्जेदार निघते तसेच मालाचा दर्जाही हा उत्तम असल्यामुळे त्याची विक्री देखील चांगल्या पद्धतीने करता येते. 

कृष्णा आगळे यांचे शिक्षण कला शाखेमधून पदवीधर पर्यंत झाले आहे.  त्यांनी या शेतीमध्ये दोन गुंठ्यात नर्सरी देखील सुरू केली असून, यामध्ये दोन लाख रुपये विक्रीतून सव्वा सहा लाख रुपयांचा नफा मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

 

Leave a Reply