Tur market price : तुरीचा हंगाम मध्यावर; आता फेब्रुवारीत वाढणार का बाजारभाव? जाणून घ्या

Tur market price : मागील आठवड्यात तुरीला राज्यातील बाजारात सरासरी ७२४० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव होता. तुरीचा हमीभाव यंदा रु. ७५५०/क्विंटल असून त्यापेक्षा हा बाजारभाव कमी आहे. मात्र शेतकऱ्यांना तुरीचा बाजारभाव वाढण्याची अपेक्षा असून या महिन्यात तुरीचा बाजारभाव वाढेल की नाही ते जाणून घेऊ.

भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक तसेच उपभोक्ता देश आहे. भारतातील तूर उत्पादनात महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्यांचा वाटा ६० टक्के पेक्षा जास्त आहे. तूरीच्या बाजारपेठेवर मागील वर्षातील तूर साठा, आयात तसेच चालू वर्षातील उत्पादन यांचा परिणाम होताना दिसतो. केंद्र शासनाने तूर निर्यातीसाठी खुली केली असून तूरीचा आयात कोटा मर्यादित ठेवलेला आहे.

माहे डिसेंबर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष जानेवारी (२२ जानेवारी २०२५) मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहिलेली दिसून येत आहे. जानेवारी २०२५ मध्ये १२.१ लाख टन आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत १९.३ लाख टन होती.

तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३५.०२ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रातील २०२२-२३ मधील उत्पादन ८.६ लाख टनांवरून सन २०२३-२४ मध्ये १०.१ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

डिसेंबर २०२२ पासून तुरीच्या किंमती वाढत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव कमी आहेत. मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या फेब्रुवारी मधील सरासरी किंमती खालीलप्रमाणेः
फेब्रुवारी२०२२: रु. ६,२३६/क्विंटल
फेब्रुवारी २०२३: रु.७,७०३/क्विंटल
फेब्रुवारी २०२४: रु.१०.१२८/क्विंटल

सध्याच्या हंगामासाठी सरकारने खरीप २०२४-२५ साठी जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (रु. ७५५०/क्विंटल) सध्याच्या तुरीच्या किंमती कमी आहेत.

मागील वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आयात कमी झालेली आहे तर निर्यात वाढलेली आहे. लातूर बाजारातील संभाव्य किंमती: फेब्रुवारी २०२५ मध्ये ७,३०० ते ७,९००/क़्वि. सदर संभाव्य अंदाज हा FAQ ग्रेड च्या तुरीसाठी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *