सौर कृषी पंप योजनेतून भारनियमनाची समस्या संपणार,वाचा सविस्तर ..

शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. आता भारनियमनाची समस्या संपणार असून , संपूर्ण आठ तास नियमित पाणी मिळण्यास मदत होणार आहे . या योजनेसाठी शेतकरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज जमा करू शकतात . महावितरणने लाभार्थी निवडीचे निकष निश्चित केले आहेत.

२.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यांसाठी ३ HP पंप, २.५१ ते ५ एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप हा ५ एकरवरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास दिला जाईल. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषिपंपाची मागणी केली तर ती ग्राह्य धरण्यात येईल.

विहीर, बोअरवेल यांचे मालक, वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, तसेच बारमाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र असतील .महावितरणद्वारे शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहीर व नदी, आदी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री करण्यात येईल. तसेच ,हे पंप जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी वापरता येणार नाही.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ,अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व या योजनांचा लाभ ज्यांना मिळाला नाही, ते शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र असतील .

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’? काय आहे ‘

राज्यात सौर कृषी पंप कार्यान्वित होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंच- नाकरिता पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा नाही तसेच ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत अशी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आहे. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच केवळ १० टक्के रक्कम भरून दिला जाईल. तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या शेत- कऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के भरावा लागेल.केंद्र आणि राज्य सरकार- कडून उर्वरित रक्कम अनुदान म्हणून दिली जाईल. योजनेंतर्गत ३ ते ७.५ एचपीचा पंप जमिनीच्या क्षेत्रानुसार देण्यात येईल.इन्शुरन्ससह संच दिला जाणार आहे. पाच वर्षांची सौर पंपाची दुरुस्ती हमी दिली जाईल . सौर ऊर्जेवर पंप चालणार असल्यामुळे वीज बिल येत नाही, त्यामुळे भारनियमनाची चिंता शेतकऱ्यांना नसते .

येथे करावा लागेल अर्ज

महावितरणच्या अधिकृत वेब पोर्टलवर https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php भेट द्या.
A-1 अर्ज ऑनलाइन भरा. अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी आहे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.

अर्जासोबत खालील कागदपत्रे अपलोड करावीत:

🔰 7/12 उतारा (जलस्त्रोताची नोंद आवश्यक आहे).

🔰 जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती लाभार्थ्यांसाठी)

🔰आधारकार्ड.

🔰पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र.

🔰इतर हिस्सेदारांचा ना हरकत दाखला (शेतजमिनीचा एकटा मालक नसल्यास)

Leave a Reply