राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मंत्रालयात आज बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील पीक पाण्याचाही आढावा घेण्यात आला. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवली जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
औरंगाबाद विद्यापीठाच्या नावामध्ये औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजी नगर बदल करण्यास देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे. याबाबत सीएमओ ऑफिसच्या अकाउंटंट वरून अधिकृत ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील हे सात महत्त्वपूर्ण निर्णय.
🔰राज्यामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती.
🔰सार्वजनिक खाजगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण मोठ्या प्रमाणावर खाजगी गुंतवणूक जलविद्युत मध्ये येणार.
🔰सांगली ,अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय.
🔰पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना एक एकर पेक्षा कमी जमीन मिळणार.
🔰फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार.
🔰भोसला मिलिटरी स्कूल ला नागपूर येथे जमीन.
🔰विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर बदल करण्यास मान्यता .
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
👉 संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे :
✅ राज्यात मुलींच्या… pic.twitter.com/abo9XMBbxF
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 10, 2023