जानेवारीत मिळणार द्राक्षांचा गोडवा; निर्यातीचा टक्का वाढण्याची शक्यता,वाचा सविस्तर ..

जिल्ह्यातील सुमारे पावणे दोन लाख एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या द्राक्ष बागांची गोड्या बहार छाटणी पूर्ण झाली आहे.  व द्राक्ष लगडण्याच्या स्थितीत असलेल्या द्राक्षबागा कधी नव्हे एवढ्या जोमात बहरल्या आहेत. 

त्यामुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात खवय्यांच्या जिभेवर गोडवा पेरतील.  अनुकूल वातावरण राहिल्यामुळे औषध फवारणी कमी होऊन खर्चात बचत होण्याबरोबरच ‘रेसिड्यू फ्री’ द्राक्षांचे क्षेत्र अधिक प्रमाणात राहणार असून, निर्यातीचा टक्का वाढण्याची चिन्हे आहेत. 

रसाळ गोड द्राक्षांच्या बागा  यंदा  फुलल्या आहेत. या वर्षात पावसाचा मुक्काम न लांबल्याने  शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने गोड्या बहार छाटणी करता आली ,शिवाय थंडीचे आगमन  काही दिवसांसाठी  लांबल्याने फुलोऱ्यातील बागांमध्ये दर्जेदार फळ येण्याची चिन्ह आहेत.

वातावरणाचा अडथळा नसल्याने द्राक्ष उत्पादकांनी यंदा निर्यातक्षम द्राक्ष पिकवण्यासाठी कंबर कसली आहे.सध्या छाटणी होऊन दीड महिना उलटला आहे फुलोरा व मनी लगडण्याच्या अवस्थेत बागा आहेत.  प्रत्येक झाडावर 35 ते 40 घड दिसत आहेत.  पाऊस ,थंडी नसल्याने रोगाचे आक्रमक अद्याप तरी झालेले नाही.

पोषक वातावरणामुळे फुगवणी व्यतिरिक्त अतिरिक्त कीटकनाशक, बुरशीनाशक, औषध फवारणीची वेळ आलेली नाही.  त्याचाच परिणाम औषधांचा अंश नसलेले द्राक्षांची नमुने अधिक संख्येने निर्यातीसाठी प्रामाणिक होण्याची चिन्ह आहेत . द्राक्षाचे नमुने अधिक संख्येने निर्यातीसाठी प्रामाणिक होण्याची चिन्ह आहेत . पूरक स्थितीमुळे औषध फवारणीच्या खर्चात बचत झाली शिवाय सातासमुद्र पार द्राक्ष निर्यात करण्याची संधी शेतकऱ्यांना अधिक खुणावते आहे.

दहा हजार कंटेनर निर्यातीची शक्यता.

मागील वर्षी महाराष्ट्रातून आठ हजार पाचशे कंटेनर द्राक्ष युरोप, रशिया येथे निर्यात झाले यंदा प्रदेशातून मागणी वाढण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात निर्यातदारांनी यंदा तयारी दाखवली आहे.  यंदा दहा हजार कंटेनर चा टप्पा पार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

त्यातीलच 7000 द्राक्ष कंटेनर नाशिक जिल्ह्यातून निर्यात होण्याची शक्यता आहे.  यातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळू शकते.  उत्तर भारतात थंडीची लाट न आल्यास उठाव राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करण्याची शक्यता आहे.

एकरी 110 क्विंटल उत्पन्न अपेक्षित.

विविध संकटांशी सामना करून खवय्यांच्या पसंतीला उतरतील अशी रसाळ द्राक्ष पिकविण्यात नाशिकच्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे.निफाड दिंडोरी, नाशिक परिसरात सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये टप्प्याटप्प्याने छाटणी झाली बागलाणमध्ये अद्याप छाटणीमुळे देखील द्राक्ष बाजारात दाखल झाली असून निर्यातीसाठी 125 रुपये किलो दर त्यांना मिळत आहे.  निफाड सह परिसरातील द्राक्ष जानेवारीच्या मध्यावर परिपक्व होऊन यांचे तोंड गोड करतील. एकरी 110 क्विंटल द्राक्ष उत्पादन अपेक्षित आहे.

परतीचा पाऊस न झाल्याने द्राक्ष हंगामासाठी पूरक ठरले आहेत . रोगाचा प्रादुर्भाव नसल्याने अति विषारी औषध फवारणी करण्याची वेळ आली नाही त्यामुळे निर्यातीसाठी अधिक भागांना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.  निर्यातदार व्यापाऱ्यांची हालचाली पाहता टक्का वाढू शकतो चांगल्या बाजारभावाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे .सुनील जाधव द्राक्ष उत्पादक पिंपळगाव बसवंत.

मागील वर्षी महाराष्ट्रातून निर्यात झालेली साडेआठ हजार कंटेनर द्राक्ष परदेशी खवय्यांच्या पसंतीला उतरली आहेत. त्यामुळे यंदा युरोप ,रशियामधून मागणी वाढण्याची शक्यता आहे.  त्यातूनच शेतकऱ्यांनी यंदा कमी प्रमाणात कीटकनाशके वापरल्याने निर्यातीसाठी ही बाब पुरक आहे . दहा हजार कंटेनर निर्यातीचा अंदाज आहे.  -लक्ष्मण सावळकर, द्राक्ष निर्यातदार, मॅग्नस पार्म फ्रेश

Leave a Reply