Maharashtra Weather Update : हवामान अंदाज सांगतो की राज्यात या ठिकाणी पडणार पाऊस..

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात थंडी कायम आहे. दरम्यान काही ठिकाणी पाऊस पडू शकेल असा अंदाज नाशिक येथील हवामान अभ्यासक विजय जायभावे यांनी व्यक्त केला आहे.

त्यानुसार दिनांक 25 नोव्हेंबर ला निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा तामिळनाडू केरळ या भागातून अरबी समुद्रावर दाखल झाला असून तो कमकुवत झाला आहे मात्र उत्तरे कडील वारे आणि दक्षिणे कडील वारे यांची मध्य भारतात आणि महाराष्ट्र वर जोड हवेचे क्षेत्र निर्माण झाले असल्यामुळे जास्त खराब हवामान पुढील दोन दिवस राहिले. त्यामुळे किरकोळ ठिकाणी हलका पाऊस होईल.

दिनांक 9/10 डिसेंबर बं. उपसागरावर पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल राज्यात याचा विशेष परिणाम जाणवणार नाही. दिनांक 16/17 डिसेंबरला देखील पुन्हा एक तीव्र कमीदाबाचा पट्टा बं. उपसागरावर निर्माण होईल याचा प्रभाव दक्षिण भारतात जास्त राहिल आंध्र तामिळनाडू केरळ कर्नाटक या भागात जोरदार पाऊस होईल महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान त्या काळात होईल.

उत्तर महाराष्ट्र 4 डिसेंबर
उत्तर महाराष्ट् पुढील तीन दिवस धुळे जळगाव छत्रत्रपती संभाजी नगर नाशिक अहमदनगर ढगाळ हवामान कायम धुके हलकी रिपरिप राहिल

*पावसाचा अंदाज?*
सिंधुदुर्ग, रायगड रत्नागिरी, ठाणे मुंबई पालघर काही भागात तीन दिवस  हवामान आणि अवकाळी पाऊस होईल.
मध्य महाराष्ट्रात 4 डिसेंबर पुढील  दोन दिवस तर सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली परिसरात ढगाळ हवामान होऊन पाऊस पडेल.

मराठवाडा 4 डिसेंबर पुढील दोन दिवसात लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे, तर जालना बीड परभणी जिल्हयातील काही भागात ढगाळ हवामान कायम राहील

विदर्भात 4 डिसेंबर पुढील दोन दिवस नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या जिल्ह्यात काही भागात ढगाळ हवामान होईल. बुलढाणा वाशीम अकोला अमरावती यवतमाळ सर्वत्र किरकोळ ढगाळ हवामान पुढील चार दिवस राहील, असा अंदाज आहे.

Leave a Reply