पीएम ‘किसान’ सन्मान निधीत वाढ होणार? किसान क्रेडिट कार्डविषयीही मोठा निर्णय? अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ‘या’ मोठ्या घोषणा होण्याची शक्यता, वाचा सविस्तर

23 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे यावेळी केंद्र सरकार कोणत्या घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे यावेळी शेतकऱ्यांसाठीही मोठ्या घोषणा होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतून सरकार यावेळी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करणार का? या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी चार महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे असे सांगितले जात आहे.

शेतकरी सन्मान निधीमध्ये होणार वाढ?

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे चार निर्णय केंद्र सरकार यावेळी घेण्याची शक्यता आहे. अर्थात ही फक्त शक्यता वर्तवली जात आहे . अर्तसंकल्प सादर केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी सरकारने कोणत्या तरतुदी केल्या हे स्पष्ट होईल. मागील अनेक दिवसांपासून पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे . सध्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपयांची मदत करण्यात येते . वाढता खर्च व वाढती महागाई लक्षात घेता ही मदत 8000 रुपयांपर्यंत वाढवण्यात यावी यासाठी मागणी होत आहे.

किसान क्रेडिट कार्डसंदर्भात मोठी घोषणा होऊ शकते ..

सद्यास्थितीला शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दिले जाते. या कर्जासाठी ७ टक्के व्याजदर आकारण्यात येते . विशेष म्हणजे सरकारतर्फे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देण्यात आलेल्या कर्जावरील व्याजावर 3 टक्के अनुदानही देण्यात येते म्हणजेच शेतकऱ्यांना हे व्याज फक्त ४ टक्के दराने मिळते.शेतीच्या खर्चातील वाढ व महागाई लक्षात घेता कर्जाची ही रक्कम 4-5 लाख रुपये केली जाऊ शकते. तशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे .

जीएसटी कमी होण्याची शक्यता..

सरकारकडून वेगवेगळ्या शेतीविषय उपकरणांवर जीएसटी आकारला जातो. शेतकऱ्यांकडून याच जीएसटीला विरोध केला जातो. सरकारने शेतकरी उपकरणांवरील जीएसटी हटवावा अथवा इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे . केंद्र सरकार हीच बाब लक्षात घेता जीएसटी कमी करणे किंवा अनुदानात वाढ करेल असे निर्णय घेऊ शकतात . अशा प्रकारे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा करेल अशी शक्यता आहे.

सौर कृषीपंपविषयी केली जाऊ शकते घोषणा..

देशभरातील शेतकऱ्यांना सौर कृषीपंप केंद्र सरकारकडून दिला जात आहे . त्यासाठी विशेष अनुदान देण्यात येते . सौर कृषीपंपातून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर हा गिरणी चालवणे, चारा कापणे, तसेच इतर घरगुती कामांसाठी केला जातो , असे शेतकऱ्यांना वाटते. केंद्र सरकार याच मागणीसंदर्भात शेतकऱ्यांसाठी काही तरतुदी करू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *