खरीप हंगाम 2023 मध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पीक प्रतिकूल परिस्थिती आढळून आलेली आहे ,आणि याचमुळे राज्यातील २४ जिल्ह्यांना पिक विमा तर ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार आहे . मित्रांनो राज्यांमध्ये जून महिन्यामध्ये उशिरा आलेला पाऊस जुलै महिन्यामध्ये काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये पडलेल्या पावसाचा खंड यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
सरासरी उत्पादन खर्चाच्या 50 टक्के पेक्षाजास्त घट उत्पादना मध्ये दिसून आलेली आहे, आणि याच पार्श्ववभूमीवरती राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये अधिसूचना निर्गमित करुन या जिल्हा मधील महसूल मंडळाला पिक विमा साठी पात्र करण्यात आलेले आहे . राज्य शासनाच्या माध्यमातून 2023 मध्ये सर्वसमावेशक पिक विमा योजना राबवली जात आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक रुपया मध्ये पिक विमा उतरवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचाही चा हिस्सा राज्य शासनाच्या माध्यमातून 5 ऑक्टोबर 2023 रोजी पिक विमा कंपन्या ला वितरित करण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी 1034 कोटी रुपयांचा वितरण हे राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी हप्ता म्हणून पिक विमा कंपन्यांना अनुदान स्वरूपामध्ये वितरित करण्यात आलेले आहे. याचबरोबर जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भात आणि मराठवाड्यातील 11 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यासाठी एक हजार 71 कोटीरुपये हे ११ जिल्ह्याना वितरित करण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा स्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून अधिसूचना निर्गमित करण्यात आले आहेत . ज्या ५ सप्टेंबरपासून 22 सप्टेंबर पर्यंत निर्गमित करण्यात आल्या आहेत .
तर या पार्श्वभूमी एक महिन्याच्या आत पिक विमा वितरण होणे देखील आवश्यक आहे याच पार्श्ववभूमीवरती हा निधी वितरित झाल्यामुळे साधारणपणे 12 ते १३ ऑक्टोबर नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 25% अर्थात अग्रीम पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे . आपण जर पाहिलं तर साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिवाळीस सुरुवात होते आणि दिवाळीच्या पार्श्वभूमी वरती शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो . यापासून ते पिक विमा कंपनीच्या माध्यमातून साधारपणे 15 ऑक्टोबर ते नोव्हेंबर च्या पहिला आठवडाच्या या कालावधीमध्ये अग्रिम पीकविम्याचे वाटप केले जावू शकते .
24 जिल्हे नेमके कोणते आहेत?
त्याच्यासाठी पिक विमा साठी पात्र झालेले जिल्हे आहेत ज्याच्या मध्ये नाशिक ,नंदुरबार, धुळे ,जळगाव ,पुणे, अहमदनगर, सोलापूर ,सातारा, त्याप्रमाणे सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर ,जालना ,बीड, लातूर ,परभणी याचप्रमाणे धाराशिव नांदेड ,हिंगोली ,अमरावती ,बुलढाणा, अकोला, वाशिम ,नागपूर ,आणि चंद्रपूर जिल्ह्याचा पिक विमा साठी समावेश करण्यात आलेला आहे तर जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भात आणि मराठवाड्यातील11 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये विदर्भातील अमरावती ,अकोला, यवतमाळ, बुलढाणा, आणि वाशिम या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे आणि एकूण अमरावती विभागातील या पाच जिल्ह्यासाठी 557 कोटी 26 लाख रुपये तरज्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्यासाठी 77 कोटी 75लाख रुपये एवढे नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
तर मराठवाड्यातील जालना ,परभणी ,हिंगोली ,नांदेड ,बीड, आणि लातूर अशा सहा मराठवाड्यातील एकूण अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना1071 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई वितरित केले जाणार आहे . नुकसान भरपाई मिळण्यासाठी उशीर होऊ शकतो त्याचे केवायसी प्रक्रिया , त्याच्या निधीचे वितरण हा कार्यकाल जास्त होऊ शकतो परंतु पिक विमा साठी मात्र दिवाळीपूर्वीच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम क्रेडिट केली जाऊ शकते.
हे या जिल्ह्यांमध्ये आधिसुचना काढल्यानंतर बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये सोलापूर असेल ,लातूर असेल ,अमरावती असेल पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आले . तर पात्र केलेली महसूल मंडळात कमी करण्यासंदर्भात यांच्या माध्यमातून वारंवार आक्षेप नोंदवले जातात आणि याच पार्श्वभूमी वरती ५ ऑक्टोबर 2023 मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे . या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा व्यवस्थित पणे सर्वेक्षण करून जो आक्षेपाचा मुद्दा आहे तो सोडवावा आणि पिक विमा कंपनीच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकऱ्यांना 25 टक्के पीक विमा वितरित करावा अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आले आहेत . आता तर अशा प्रकारे या प्रतिकूल परिस्थितीच्या संदर्भातील एक महत्वाची माहिती होती नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद