उसाच्या ‘या’ नव्या जातीमुळे एकरी निघणार १०० टनाहून अधिक उत्पादन,शेतकऱ्यांना मिळणार फायदा ..

एक आनंदाची बातमी आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे. एक नवीन ऊसाचा वाण (Phule Sugarcane 11082) महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी विकसित केले आहे, “फुले ११०८२”. हा वाण लवकर पक्व होतो, जास्त उत्पादन देतो आणि रोगांनाही तगडा प्रतिकार करतो.

फुले ११०८२ वाणाची वैशिष्ट्ये:

✅  लवकर पक्व: इतर वाणांपेक्षा हा वाण लवकर पक्व होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर उत्पादन मिळण्यास मदत होते .

✅ उच्च उत्पादन:इतर वाणांपेक्षा या वाणाचे उत्पादन जास्त असते. म्हणजेच, कमी जागेतून जास्त उत्पादन घेता येते.

✅ रोग प्रतिकारक शक्ती: चाबूक काणी, पाने पिवळी पडणे, मर आणि लालकूज यासारख्या रोगांना हा वाण प्रतिकारक आहे.

✅ कीटक प्रतिकारक शक्ती: खोड किड, कांडी किड आणि शेंडे किडीस हा वाण कमी बळी पडतो.

✅ पाणी शोषण क्षमता: या वाणाची मुळे खोलवर जात असल्याने तो पाणी शोषणात चांगला आहे.

✅ उच्च साखर प्रमाण: या वाणामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.

✅ जास्त टिकाऊ: जास्त टिकाऊ हा वाण असल्याने तो वाहतुकीसाठी योग्य आहे.

शेतकऱ्यांसाठी फायदे:

आर्थिक लाभ: कमी खर्चामुळे आणि अधिक उत्पादयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल .

कमी मेहनत: रोगांना हा वाण प्रतिकारक असल्यामुळे त्याची लागवड आणि देखभाल सोपी आहे.

बाजारपेठेत मागणी: या वाणाची बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

 
 

Leave a Reply