राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना आवाहन, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक, फक्त शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस पाठवण्याची घाई करू नये..

राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना आवाहन, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक, फक्त शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस पाठवण्याची घाई करू नये..

साखरेचे दर जागतिक बाजारपेठेमध्ये प्रतिक्विंटल 3500 च्या पुढे गेले आहेत, त्यामुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर साखर कारखान्यांनी ऊस प्रति टन 400 रुपये जमा करावे.  शेतकऱ्यांनी ऊसदर निश्चित झाल्याशिवाय कारखान्यास पाठवण्यात घाई करू नये. 

राजू शेट्टी म्हणाले पाऊस कमी असल्यामुळे यावर्षी एकरी दहा ते बारा टन  उत्पादन घटणार आहे.  सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने जेमतेम तीन महिने चालतील.  तसेच महाराष्ट्रातील उसाची कर्नाटक मध्ये साखर कारखान्यांकडून पळवापळवी होणार आहे . त्याशिवाय कारखान्यांनी गाळप क्षमता  वाढवली आहे.  त्यामुळे यंदाचा हंगामा शेतकऱ्यांना लाभदायक होणार आहे. 

कोल्हापूर येथील साखर आयुक्त कार्यालयावर 13 सप्टेंबरला मोर्चाचे आयोजन  केले असून त्यामध्ये महाराष्ट्र सह कर्नाटक सीमा भागातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असेही त्यांनी यावेळी सांगितले . त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी 13 सप्टेंबरच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आव्हान केले आहे.  बेळगाव जिल्ह्यातील बोरगाव येथे आयोजित निर्धार सभेत ते बोलत होते. 

कारखान्यामध्ये उत्पादित होणारे इथेनॉल वीज निर्मिती ट्रान्सपोर्ट या अंदाजावरून कारखान्यांनी एफ आर पी देणे बंधनकारक आहे.  परंतु असे होत नसल्याने ऊस उत्पादकांना नुकसान सोसावे लागत आहे.  असे खासदार राजू शेट्टी यावेळी म्हणाले. 

बेळगाव जिल्ह्यामधील अनेक साखर कारखाने एफआरपीप्रमाणे दर टाळाटाळ करीत आहेत . याबाबत साखर आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे . जागतिक बाजारपेठेमध्ये साखरेचे दर प्रतिक्विंटल 3500 रुपयांच्या पुढे गेले असून साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति टन 400 रुपये जमा करावेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *