Rain update : महाराष्ट्रात विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट…

Rain update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हवामानाने एक वेगळाच रंग घेतला आहे. पावसाने घेतलेली विश्रांती आणि अचानक वाढलेली उष्णता यामुळे राज्यात संमिश्र स्वरूपाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही भागांत रिमझिम पावसाची चाहूल आहे, तर काही ठिकाणी ढगाळ हवामान असून ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. काही जिल्ह्यांत उकाड्याची तीव्रता जाणवते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेती कामांवर परिणाम होत आहे.

➡️ शेतकऱ्यांची चिंता आणि पावसाची प्रतीक्षा

खरीप हंगाम सुरू असून पेरणीचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र पावसाच्या विश्रांतीमुळे जमिनीत ओलावा कमी झाला आहे. शेतकरी वर्ग आता पुन्हा एकदा जोरदार पावसाच्या आगमनाची वाट पाहत आहे. पिकांच्या वाढीसाठी आणि पुढील टप्प्यांतील शेती कामांसाठी पावसाचे वेळेवर आगमन अत्यंत आवश्यक आहे.

➡️ हवामान खात्याचा अंदाज: पावसाला पोषक वातावरणाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. आज मंगळवार, दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

➡️ पावसाचा अलर्ट असलेले जिल्हे:

पश्चिम महाराष्ट्र: सांगली, सोलापूर

मराठवाडा: लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड

विदर्भ: यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर

या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यांमध्ये ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता असून उकाडा जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

➡️ हलक्या सरींची शक्यता असलेले जिल्हे:

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर

जालना, बीड

या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

➡️ तापमान स्थिती:

देशभरात मान्सूनची स्थिती कमकुवत झाल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. काल सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे झाली असून तेथे 34.8 अंश सेल्सिअस तापमान होते. पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता असल्यामुळे वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे.