आज या बाजारात सोयाबीनचे बाजारभाव वाढले? जाणून घ्या कुठे ते..
Today’s soybean market price in Latur, Akola and Maharashtra market
मागील काही दिवसांपासून शेतकºयांकडील नवीन सोयाबीन बाजारात यायला सुरूवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी यंदा पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. दुसरीकडे सोयाबीनला बाजारात खर्चाच्या तुलनेत कमी बाजारभाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकºयांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
या आठवड्यात राज्यातील बाजारपेठांमध्ये दररोज सोयाबीनची सरासरी पावणे दोन ते दोन लाख क्विंटल आवक होताना दिसत आहे. 4 हजारांच्या आसपास होता. मात्र मागच्या दोन दिवसात सोयाबीनचा बाजारभाव 4 हजाराच्या खाली आल्याचे दिसून येत आहे.
काल दिनांक 14 नोव्हेंबर रोजी लातूर बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनची सुमारे 50 हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी 3600रु. तर सरासरी 4 हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. दुसरीकडे सांगली, सातारा बाजारसमित्यांत आवक कमी असल्याने पिवळ्या सोयाबीनला सरासरी 4800 रुपयांचा बाजारभाव मिळाला.
आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी अकोला बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनचे भाव अल्पसे वधारल्याचे दिसून आले. या ठिकाणी सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी सरासरी 4 हजार रुपयांच्या जवळपास बाजारभाव होता.
दरम्यान 14 नोव्हेंबर रोजी राज्यात सोयाबीनची 129558 क्विंटल आवक, 13 नोव्हेंबर रोजी 160929 क्विंटल आवक, 12 नोव्हेंबर रोजी 216691 क्विंटल आवक, तर सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी 243041 क्विंटल अशी आवक होती. मागच्या आठवडयात सोयाबीनचे बाजारभाव सुमारे 4 हजाराच्या आसपास राहिल्याने शेतकºयांनी बाजारात सोयाबीन मोठया प्रमाणात आणला. मात्र नंतर त्यात घट होत गेल्याने शेतकºयांनी सोयाबीन साठवणुकीला पसंती दिली असून सध्या सोयाबीन आवक कमी होताना राज्याच्या कृषी पणन मंडळाकडील उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते.