Tomato Rate : टोमॅटोच्या आवकेत घट पण भावात फारशी सुधारणा नाही..

Tomato Rate : मागच्या आठ दिवसांपासून राज्यात टोमॅटोची आवक साधारण ९ ते १० हजार क्विंटलपर्यंत होत आहे. मंगळवारी दिनांक ४ मार्च रोजी राज्यात सुमारे ९ हजार क्विंटल टोमॅटो आवक झाली. पुणे जिल्ह्यात सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

सांगली जिल्ह्यात सरासरी ८७५ रुपये बाजारभाव मिळाला. नगर जिल्ह्यात ८०० रुपये तर ठाणे जिल्ह्यात १२५० रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यात ८०० रुपये सरासरी बाजारभाव मिळाला.

दरम्यान कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पातील तज्ज्ञांची दिलेल्या माहितीनुसार टोमॅटोच्या बाजारातील सप्ताहातील पुणे मागील सरासरी किमती रु. ९०० प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत ४ टक्केनी वाढ झाली आहे.

देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये १९ टक्केनी घट झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख APMC बाजारापैकी नारायणगाव बाजारात सर्वाधिक किंमती (रु.१२००/क्विं.) होत्या तर सोलापूर बाजारात सर्वात कमी किंमती (रु.५००/ क़्वि.) होत्या.

Leave a Reply