तीन ते चार दिवसापासून यवतमाळ बाजारामधील तुरीचे भाव वाढले असून तुरीच्या डाळीला 9000 ते 10 हजार 500 क्विंटल पर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे . त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
तुरीचे भाव वाढल्या कारणामुळे आता बाजार समितीमध्ये शेतकरी तूर विक्रीसाठी गर्दी करत आहेत तीन ते चार क्विंटल शेतकरी यवतमाळ बाजार समितीमध्ये दररोज तुर विक्रीसाठी आणत आहे
गेल्या पंधरा दिवसांमध्ये किरकोळ बाजारात तुरीची डाळ ही पंधरा रुपयांनी महागली आहे तुरीचा दर हा 160 रुपये किलोवर पोहोचलेला आहे तूर डाळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसणार आहे आता ग्राहकांना तूर डाळ खरेदी करणे अवघड झालेले आहे. तुरीचा साठा कमी झाल्यानंतर तूर उडदाचे भाव घसरतील किंवा स्थिर राहू शकतील.
घाऊक विक्रेत्याकडे उडदाचा व तुरीचा साठा हा दोनशे टन तसेच किरकोळ विक्रेत्यांकडे आणि किरकोळ दुकानदारांकडे हा साठा पाच टन व मोठ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी डेपोमध्ये दोनशे टन तुरीचा साठा ठेवण्याची मर्यादा आहे.
केंद्र सरकारने बेहिशोबी साठे दारीला नियंत्रण ठेवण्यासाठी एक कडक पाऊल उचलले आहे . 19 टक्क्यांनी तुरीच्या डाळीची सरासरी किंमत वाढवून 160 रुपये प्रति किलो झाली आहे . मागील वर्षी ही किंमत 103.25 रुपये प्रति किलो होती.