हळदीला प्रतवारीनुसार क्विंटला मिळतोय इतका दर ? जाणून घ्या सविस्तर ….

यंदाच्या हंगामामध्ये बाजार समितीत दररोज हळदीची आवक सुमारे तीन हजार पोत्यांची होत आहे. मागणी चांगली आहे त्यामुळे उठावही होत आहे. हळदीला प्रतिवारीनुसार प्रति क्विंटल १३ हजारांपासून ते २५ हजार रुपये इतका दर मिळत आहे. हळदीचे दर गेल्या चार दिवसांपासून टिकून आहेत. हळद उद्योगातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार हळदीचे दर येत्या महिनाभर टिकून राहतील.

सांगली ,सातारा जिल्ह्यातील हळद काढणी सुरू झाली आहे. अजूनही हळद काढणीला फारशी गती आली नाही. या दोन्ही जिल्ह्यांमधील नवी हळद मार्केटमध्ये सौद्यास येऊ लागली आहे. हळद मार्केटमध्ये सुमारे तीन हजार पोती (एक पोते ५० किलोचे) दररोज आवक होत आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षीच्या हंगामात हळदीला चांगला भाव मिळत असल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

मागील वर्षी हळद हंगामाच्या सुरुवातीला प्रतवारीनुसार हळदीला प्रति क्विंटल ७ हजार ते ८ हजार रुपये इतका दर मिळाला होता . शेतकऱ्यांनी कमी पाऊस असून देखील काटेकोर नियोजन केले व दर्जेदार हळदीचे उत्पादन घेतले आहे. सध्या सातारा व सांगली जिल्ह्यांतील हळद विक्रीला येत आहे.

वसमत ,हिंगोली पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणीची हळद विक्रीसाठी येईल. तर पुढच्या आठवड्यापासून जळगाव येथील हळद विक्रीसाठी येणार आहे. हळद हंगामाच्या सुरुवातीपासून हळदीला दर टिकून राहिले आहेत. हळदीच्या दरात येत्या महिनाभर फारसा चढ-उतार होण्याची शक्यता नाही.असा अंदाज आहे.

प्रतवारीनुसार हळदीचे दर (प्रति क्विंटल)

कणी…१३ हजार ते १४ हजार

लगडी…२२ हजार ते २५ हजार

मध्यम…१६ हजार ते १७ हजार

यंदा हळदीचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या स्थानिक हळद विक्रीस येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दर चांगले आहेत. येत्या महिनाभर दर टिकून राहतील असा अंदाज आहे.
– गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *