
Turmeric price : राज्यात या आठवड्यात काही ठिकाणी हळदीचा दर वधारला असून हळदीला सोन्याची झळाली मिळाली आहे. दरम्यान २१ जूनपर्यंतच्या सात दिवसांत महाराष्ट्रातील विविध बाजारांमध्ये हळदीच्या आवक व दरांमध्ये चढ-उतार दिसून आले. या काळात दररोज सरासरी ८ हजार ते १० हजार क्विंटल इतकी आवक राज्यभरात नोंदली गेली. हळदीला सर्वाधिक दर मुंबई बाजारात मिळाला तर सरासरी बाजारभावात सांगली आघाडीवर राहिला.
गेल्या सात दिवसात हळदीचा सरासरी जास्तीत जास्त दर मुंबईत २५ हजार रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला. येथे १६ ते २१ जूनदरम्यान सातत्याने १९ हजार ते २५ हजार रुपयांदरम्यान हळदीचे दर राहिले. तर सरासरी बाजारभावाच्या तुलनेत सांगली बाजाराने आघाडी घेतली. १६ जून रोजी सांगलीत सरासरी दर १२५५० रुपये, १७ जूनला १२ हजार, २० जूनला १३५०० दर होते. उपलब्ध दिवसांचा विचार करता सांगलीचा सरासरी बाजारभाव इतर बाजारांपेक्षा जास्त राहिला. सांगलीत १६ जूनला ४४७ क्विंटल आवक असून सरासरी दर १२५५० रुपये होता. १७ जूनला ७७४ क्विंटल, २० जूनला ४२० क्विंटल आणि २१ जूनला फक्त १०२६ क्विंटल इतकी आवक राहिली.
नांदेड बाजारात १६ जून रोजी हळदीची आवक १८२३ क्विंटल तर सरासरी दर १२२०० रुपये नोंदवला गेला. १७ जूनला १०४५ क्विंटल, १८ जूनला १३९२ क्विंटल, १९ जूनला १३२८ क्विंटल, २० जूनला १०६७ क्विंटल इतकी आवक राहिली. या काळात दर सरासरी १२ हजार ते १२२४५ रुपयांच्या दरम्यान राहिले.
हिंगोलीत १६ जूनला १८२५ क्विंटल हळद आली असून सरासरी दर ११७०० रुपये होता. १७ जूनला आवक २०५० क्विंटल, १८ जूनला १६८०, १९ जूनला १४८०, २० जूनला १७५० क्विंटल होती. हिंगोलीत सरासरी दर ११४०० ते ११८०० रुपयांच्या दरम्यान स्थिर होता.
एकंदरीत, हळदीच्या बाजारात मोठ्या हालचाली नाहीत, परंतु मुंबई बाजारातील उच्च दर आणि सांगलीतील स्थिर सरासरी दर शेतकऱ्यांसाठी सकारात्मक संकेत आहेत. मात्र नोंद असलेली आवक आणि दर तपासून शेतकऱ्यांनी पुढील विक्रीचे योग्य नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.