दीपक त्रिंबक नाठे यांना एकूण दहा एकर बागायत क्षेत्र आहे. त्यापैकी साडेतीन एकरामध्ये शेडनेट उभारणी केली असून त्यामध्ये मुख्य पीक म्हणून ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. मागील काही वर्षात दोन एकरावर ढोबळी मिरचीची लागवड केली असून दीड एकरात पीक पद्धतीचा अभ्यास करून भरताच्या वांगीची लागवड केली जाते. जी वांगी रंगाने जांभळी लांब असतात योग्य व्यवस्थापन आणि वाण निवडीतून अधिक उत्पादकता आणि गुणवत्ता साधली जाते.
मागील वर्षामध्ये ढोबळीचे उत्पन्न घेत असताना बाजारातील मागणीचा अभ्यास केला बाजाराच्या मागणीनुसार भाजीपाला उत्पादनावर जोर दिला बाजारातील मागणी आणि हमखास मिळणाऱ्या चांगल्या दराचा अभ्यास करून त्यांनी वांगी लागवडीचा निर्णय घेतला.
लागवडीसाठी पूर्वतयारी :-
लागवडी च्या अगोदर त्यांनी जमीन तयार करून घेतली .त्यामध्ये पाच बाय अडीच फूट अंतराचे बेड तयार केले. त्या बेडवर शेणखत सेंद्रिय खत सूक्ष्म अन्नद्रव्याच्या मात्रा दिल्या त्यानंतर बेडवर तीस मायक्रोन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरून घेतला.
वान निवड व रोप निर्मिती:-
योग्य जातीचे व खात्रीशीर बियाणांची ते स्वतः निवड करतात जेणेकरून भरताची जांभळ्या रंगाची गोल लांबट अशी वांगी मिळतील. खरेदी केलेली बियाणे रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका धारकांकडे दिली जाते. साधारणपणे 35 दिवसांनी गुणवत्तापूर्व आणि सदृढ रोपे तयार होतात .त्यानंतर तयार रोपांची दीड एकरात शेडमध्ये साधारण दहा मार्च दरम्यान लागवड करण्यात येते.
खत व्यवस्थापन
पिकांना योग्य वेळापत्रक करून रासायनिक खते दिले जातात.वाढीच्या अवस्थेमध्ये खत मात्रा देण्यामुळे वाढ फुलधारणा चांगली मिळते.
लागवडीनंतर तर आठ दिवसांनी मात्रा दिली जाते.
चांगला रंग येण्यासाठी फेरस ची अधिक गरज असते .त्यासाठी योग्य प्रमाणात फेरसची मात्रा दिली जाते.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची दर आठ दिवसांनी मात्रा दिल्या जातात.
वांग्याची लागवडी मध्ये सर्वाधिक शेंडे व फळ पोखऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकाच वेळोवेळी निरीक्षण केले पाहिजे रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी फवारणी केल्या पाहिजे.
विक्री नियोजन
लागवडीनंतर साठ दिवसांनी झाडे बांधणीची कामे केली जातात.
लागवडीच्या नंतर 70 ते 80 दिवसांमध्ये वांगी काढण्यास सुरुवात होते.
साधारण दीड एकर मध्ये 400 कॅरेट प्रत्येक आठवड्याला माल निघतो.
बाजारभाव मिळण्यासाठी मालाची तोडणी ही योग्य वेळी केली पाहिजे. काढणीनंतर फळाची प्रतवारी केली जाते. कीडग्रस्त फळे वेगळी केली जातात.
तोडणी केल्यानंतर फळाची योग्य ती पॅकिंग केले जाते बाजारात पोहोचेपर्यंत मालाचा दर्जा चांगला राखला जातो.