राज्यामध्ये खरीप हंगाम तोंडावर आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या वेगवेगळया बियाणांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वमशागतीचा शेवटचा टप्पा मराठवाड्यामध्ये संपत आला असून दरम्यान, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने खरीप पिकांच्या या वाणांची शिफारस केली आहे.
४ जूनपासून पुढील पाच दिवस मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावणार आहे तसेच खरीपाच्या पेरणीसाठी कोणत्या वाणांची निवड करावी याविषयी शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. शेतकरी कापूस बियाणांच्या वाणांसाठी आक्रमक झाले असताना शेतकऱ्यांना परभणी कृषी विद्यापीठाने एकूणच खरीप वाणांच्या निवडीसंदर्भात शिफारशी केल्या आहेत.
खरीप हंगामासाठी या पाच पिकांसाठी करा खालील वाणांची निवड
◼️ कापूस : पिकाच्या लागवडीसाठी वाण निवडताना जमिन व हवामान, लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म,कोरडवाहू किंवा बागायती, यांचा विचार करून वाणांची निवड करावी.
◼️ तुर : पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-2013-41(गोदावरी), बीएसएमआर-736,बीडीएन-711, बीएसएमआर-853 (वैशाली), बीडीएन-716, बीडीएन-708 (अमोल), एकेटी 8811, बीडीएन-2,आयसीपीएल 87119 किंवा पीकेव्ही तारा इत्यादी वाणांचा वापर करावा.
◼️ भुईमूग : पिकाच्या लागवडीसाठी एसबी-11, जेएल-24,टीएलजी-45, एलजीएन-1, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24, टीजी-26, एलजीएन-123 इत्यादी वाणांचा वापर करावा.
◼️ उडीद : लागवडीसाठी टीपीयू-4, बीडीयु-1, टीएयू-1, इत्यादी वाणांचा वापर करावा.
◼️ मका : पिकाच्या पेरणीसाठी केएच-9451, एमएचएच, प्रभात,नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, करवीर, जेके-2492, महाराजा, यूवराज इत्यादी वाणांचा वापर करावा.
◼️ मुग : पेरणीसाठी कोपरगाव, बीएम-4, बीएम-2002-1, बीपीएमआर-145, पी.के.व्ही.ए.के.एम 4 , बीएम-2003-2, फुले मुग 2,इत्यादी वाणांचा वापर करावा.