पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. यामुळे काही दिवस पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. यामुळे कधी पाऊस पडेल आणि कधी हवामान थंड होईल, हे देखील समजत नाही. अचानक वातावरणात बदल होत आहे.
पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजावरून २४ तारखेपासून थंडी कमी होण्याची शक्यता आहे, तसेच २५ जानेवारी, २६ जानेवारी, २७ जानेवारी, २८ जानेवारी या तारखेला नाशिक विभागामध्ये श्रीरामपूर, शिर्डी, वैजापूर, गंगापूर, नगर जिल्हा या भागात तुरळक ठिकाणी थोडा पाऊस पडणार असा हवामान अंदाज दर्शवला आहे.
पूर्व विदर्भामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशीम, नांदेड या जिल्हात, तसेच तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, या राज्यातील काही भागात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.नंदुरबार भागात पाऊसाची शक्यता असून, नाशिक, अहमदनगर भागात ढगाळ वातावरणासह, थंडी वाढण्याची शक्यता असा हवामान अंदाज वर्तवला आहे.
हवामान अंदाजानुसार ३१ तारखेनंतर तीव्र प्रकारची रेकॉर्डब्रेक अशी थंडी पडण्याची शक्यता आहे, तसेच ५ तारखेपर्यंत तीव्र थंडी राहण्याची शक्यता आहे.
नाशिक, अहमदनगर भागात ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाची शक्यता आहे, मराठवाड्यामध्येही नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना या जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता असा हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे.