राज्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून अवकाळी पावसाची मालिका चालू आहे. काही प्रमाणामध्ये आता हा पाऊस कमी होणार आहे. कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये ८ तारखेपासून १० तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली होती . परंतु आता काही काळासाठी पावसाचे प्रमाण कमी होणार आहे.
पावसाचा अंदाज
🔴 आठ ,नऊ आणि दहा या तारखांना सातारा, सोलापूर, पंढरपूर, रायगड ,सांगली, अकलूज, कोकणपट्टी, कोल्हापूर, रत्नागिरी, या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता होती . तसेच कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्र मध्ये हा पाऊस असणार अशी शक्यता होती .
🔴 विदर्भ व मराठवाड्यामध्ये 10 मे पासून 16 मे पर्यंत कोरडे हवामान राहणार आहे. यावेळी शेतामधील सर्व कामे शेतकऱ्यांनी आटपून घ्यावीत.
🔴 12 मे या तारखेला सगळीकडे लग्नाचे मुहूर्त ठरवलेले आहेत . या तारखेला पाऊस नसल्याने लग्नाचा कार्यक्रम करण्यास कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
🔴 17 मे पासून हवामान पुन्हा खराब होणार असून राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे .