महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ या प्रकरणावर निकाल देणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) हा निकाल वाचून दाखवणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक निर्णायक केस म्हणून या केसचं महत्व कायम राहिल. सत्तासंघर्षाच्या कायदेशीर लढाईत 14 फेब्रुवारी ते 16 मार्च अशी मॅरेथॉन सुनावणी झाली. जून 2022 मध्ये प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं, पण त्यावर 8 महिन्यांनी सुनावणी सुरु झाली. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत तर शिंदे गटाच्या वतीनं हरीश साळवे, नीरज किशन कौल, महेश जेठमलानी, मणिंदर सिंह, राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहता यांनी युक्तिवाद केले. आज घटनापीठ त्यावर निकाल देणार आहे.
तत्पूर्वी निकाल जाहीर करण्याआधी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर काही प्रश्न आहेत. ते प्रश्न कोणते हे जाणून घेऊया….
आमदारांच्या अपात्रते संदर्भातली याचिका थेट सुप्रीम कोर्टात यावी की हायकोर्टाने ती आधी ऐकावी?
आमदारांच्या अपात्रतेबाबत अध्यक्षांचा निर्णय पूर्ण होऊ शकला नसेल, स्थगित किंवा प्रलंबित असेल तर अशा स्थितीत कोर्ट तो निर्णय लागू करु शकतं का?
अपात्रते संदर्भातली याचिका प्रलंबित असेल तर त्या दरम्यान सभागृहाची कार्यवाही कशी सुरु राहावी?
जर टेन्थ शेड्युलनुसार अध्यक्षांचा अपात्रतेचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करायचा असेल तर त्या दरम्यान घडून गेलेल्या घटनांची संगती कशी लावायची?
पक्षांतर बंदी कायद्यात जी एक तृतीयांश बहुमताची अटही वगळण्यात आली आहे त्याचा अर्थ काय?
एखाद्या पक्षाचा व्हीप आणि गटनेता ठरवण्यात अध्यक्षांची भूमिका किती महत्त्वाची आणि पक्षांतर बंदी कायद्याशी निगडित हे अधिकार अध्यक्ष कसे वापरु शकतात?
पक्षाचे अंतर्गत निर्णय हे न्यायालयीन समीक्षेचा भाग होऊ शकतात का?
सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांचा अधिकार आणि त्याची मर्यादा नेमकी काय ते निर्णय न्यायिक समीक्षेअंतर्गत येऊ शकतात का?
एखाद्या पक्षातल्या फुटी संदर्भात इलेक्शन कमिशन निर्णय घेऊ शकतो का?
अपात्रतेची टांगती तलवार असणारे 16 आमदार कोण?
- 1. एकनाथ शिंदे
- 2. अब्दुल सत्तार
- 3. तानाजी सावंत
- 4. यामिनी जाधव
- 5. संदिपान भुमरे
- 6. भरत गोगावले
- 7. संजय शिरसाट
- 8. लता सोनवणे
- 9. प्रकाश सुर्वे
- 10. बालाजी किणीकर
- 11. बालाजी कल्याणकर
- 12. अनिल बाबर
- 13. संजय रायमुलकर
- 14. रमेश बोरणारे
- 15. चिमणराव पाटील
- 16. महेश शिंदे
source:- abplive