शेतकरी मान्सून आला की शेतीच्या कामाची तयारी सुरु करत असतात . तसेच ते बँकांकडून कर्ज घेत असतात ,आता येत्या ३० सप्टेंबरपर्यंत खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना पीककर्ज घेता येणार आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने चालू वर्षीच्या खरीप हंगामासाठी एका महिन्यात एक हजार तीनशे कोटी चौदा लाख चौपन्न हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी चांगली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आघाडी घेतली आहे.एकूण उद्दिष्टाच्या ६८.८४ टक्के इतके कर्जवाटपाचे प्रमाण पूर्ण झाले आहे. या बॅंकेकडून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार .
सातारा जिल्हा बॅंकेनेही हाच उपक्रम मागील दहा वर्षांपासून सुरू केला आहे. यंदा १ हजार ८९० कोटी रुपयांचे पीककर्ज जिल्हा बॅंकेने खरीप हंगामातील पिकांसाठी वाटप करण्याचे ध्येय ठेवले आहे.
मागेल त्या पात्र शेतकऱ्यांना या पीककर्जाचा लाभ दिला जाणार आहे.. शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार ,तसेच त्यांना त्या कर्जावर कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. ही बाब शेतकऱ्यांसाठी चांगली आहे.