राज्यातील खूप सारे शेतकरी शेतीसोबत अनेक पूरकव्यवसाय करत असतात. यामध्ये कुक्कुटपालन , पशुपालन, शेळीपालन या सारखे व्यवसाय शेतकरी करत आहेत . यामुळे या व्यवसाय मधून त्यांना आर्थिक मदत मिळते . असे व्यवसाय करण्यासाठी सरकार सुद्धा मदत करते .
सरकार शेतकऱ्यांसाठी शेती वेतिरिक्त व्यवसाय करण्यासाठी विविध योजना व अनुदाने जाहीर करते. या व्यवसायांसाठी अनेकदा पशुसंवर्धन विभागाकडून जनावरे व पक्षी वाटप केले जातात. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे निवाऱ्याची सोय नसते त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही.
पशुसंवर्धन विभाग व मनरेगा विभाग अभिसरण
मनरेगा विभागाच्या योजना व पशुसंवर्धन विभागाच्या योजना यांचे अभिसरण या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले आहे. यामुळे या दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
मिळणार या सुविधा
मनरेगा या योजनेकडून पायाभूत सुविधा म्हणजेच वैरण, निवारा शेड, औषधे या बाबी चा समावेश असेल. तसेच पशुसंवर्धन विभागाकडून शेळी , म्हैशी, गाई, मेंढी, कुक्कुट पक्षांचे वाटप यांचा समावेश असेल . या दोन्ही योजनांचा लाभ शेतकऱ्यांना यशस्वी पूरक व्यवसाय उभारणीसाठी होणार आहे .
शासनाकडून मंजुरी
मनरेगा विभागाच्या योजना व पशुसंवर्धन विभागाच्या योजना यांना शासनाकडून यांच्या अभिसरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मागच्या महिन्यातील शासनाच्या निर्णयामध्ये याचा समावेश केला आहे .याआधी शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी शरद पवार ग्रामीण विकास योजनेअंतर्गत मदत केली जात होती.