
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला.सर्वांचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलं होतं. अर्थसंकल्पात नेमकं कोणत्या घोषणा होणार? कृषी क्षेत्राला नेमकं या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष होते . या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राकडेही लक्ष देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला काय मिळाले याबाबत सविस्तर माहिती पाहुयात.
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार
अर्थसंकल्पात अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. सर्वांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रावरही भर देण्यात आला आहे.या अर्थसंकल्पात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केला आहे. 11.8 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून सरकारी मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ दिला असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.
शेतीसाठी आधुनिक साठवणूक यंत्रणेवर भर
पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन देण्याची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे. तसेच नॅनो युरियाला जसे यश आले आहे. तसा नॅनो डीएपीचा प्रयोग करण्यात येणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत म्हणून काही योजना आखण्यात येणार आहे. तसेच शेतीसाठी आधुनिक साठवणूक यंत्रणेवर भर देण्यात येणार आहे. आतापर्यंत 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ मिळाला आहे. तर 80 कोटी लोकांना मोफत धान्यवाटप करण्यात आले आहे. तसेच सरकारने 390 कृषी विद्यापीठे सुरु केली आहेत. देश तेलबियांमध्ये आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. अर्थमंत्री सीतारामन यांनी सरकार 5 इंटीग्रेटेड अॅक्वा पार्क्स उघडणार असल्याची घोषणा केली. तसेच सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीलाही प्रोत्साहन देणार आहे.
अर्थसंकल्पातील १० मोठ्या घोषणा
1) 3 कोटी महिला होणार लखपती दीदी – सध्या देशात एक कोटी महिला लखपती झाल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. राज्यांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरली असून . आता या योजनेतंर्गत देशात 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
2) दोन कोटी घरे बांधणार – येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजननेअंतर्गत दोन कोटी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.अर्थसंकल्प 2024 मध्ये योजनेचा उल्लेख करण्यात आला असून . अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, प्रधानमंत्री सूर्योदय या योजनेंतर्गत ज्यांच्या घरात सौर यंत्रणा बसवण्यात येईल त्यांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल.
3) आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना गिफ्ट – आयुष्यमान भारत योजनेचा लाभ अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहे. या योजनेत पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सोय असते . या योजनेचा फायदा देशातील अंगणवाडी आणि आशा सेविकांना मिळणार आहे. गर्भाशयाचा कँसर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
4) रेल्वे कोचबाबत महत्वाची अपडेट – वंदे भारत ट्रेनमध्ये भारतीय रेल्वेचे 40 हजार नॉर्मल रेल्वे कोच बदलण्यात येणार आहे. सध्या वंदे भारत ट्रेनला जोरदार प्रतिसाद आहे. वंदे भारत ट्रेन लोकप्रिय देखील आहे . तर कॉरिडॉरची बांधणी पीएम गती शक्ती उपक्रमातंर्गत या करण्यात येणार आहे. हाय ट्रॅफिक कॉरिडॉरमुळे प्रवासी ट्रेन्सच संचालन अधिक गतीने आणि सुरक्षितपणे होईल.
5) विमानतळाची संख्या होणार दुप्पट – विमान वाहतूक क्षेत्रात बदल होईल.येत्या दहा वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट होईल. नवीन 149 विमानतळ उभारण्यात येणार आहे.
6) शेतकऱ्यांसाठी मदत – कृषी क्षेत्रावर अर्थसंकल्पात पण भर देण्यात आला आहे. सर्वसामावेशक कार्यक्रम दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आखला जाणार आहे. सरासरी 11.8 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून मदत देण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांना पीकविम्याचे 4 कोटी चे कवच देण्यात आले आहे.
7) टॅक्स स्लॅबमध्ये नाही बदल – या अंतरिम अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे टॅक्स स्लॅबमध्ये रचनेसंदर्भात कोणताच बदल झालेला नाही. सात लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. नव्या कर रचनेनुसार, करपात्र उत्पन्नात तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4 टक्क्यांनी वाढली आहे.
8) कृषी क्षेत्राशी संबंधित या योजना – eName शी देशातील 1361 बाजार समित्या जोडण्यात येणार आहे. त्यांच्या विकासासाठी येत्या पाच वर्षात प्रयत्न करण्यात येणार आहे.
मिशन इंद्रधनुष्य – मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत टीकाकारणावर भर देण्यात येणार आहे. देशामध्ये नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येणार आहे.
9) या पण घोषणा – आदिवासी समाजाच्या विकास कामात भर देण्यात येणार आहे. त्यांच्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. . गरिबी हटाव मोहिमेवर भर देणार येईल .