सध्या छोट्या बुटक्या आणि दिसायला गोड दिसणारा गाईचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर ती व्हायरल होताना पाहत असाल की काय? ही गाय खरंच अस्तीत्वात आहे का? असा प्रश्न ही तुमच्या मनात आला असेल. त्यासोबतच आणखी काही प्रश्नही तुमच्या मनात घोगवत असतील.ही गाय इतकी बुटकी कशी किंवा या गाईचे संगोपन करता येतं का? दूध उत्पादन चांगले का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील त्याचे उत्तर मी तुम्हाला या लेखा मधून देणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत वाचा . भारतात गाईच्या अनेक जाती आपल्याला पाहायला मिळतात हे तुम्हाला माहिती आहे. पुंगनूर ही देखील अशाच जातीं पैकी एक भारतीय गाय . जगातील सर्वात छोटी गाय म्हणून पुंगनूर गाय ओळखली जाते.
अवघ्या अडीच ते तीन फूट इतकी उंची असणारी ही गाय दिसायला अतिशय सुंदर दिसते. त्यामुळे आपल्या गोठ्यात गाय असावी. असं अनेक हौशी पशु पालकांना वाटतं. त्यामुळे अनेक पशुपालक ही गाय पाळताना दिसतात. तुम्हाला प्रश्न असाही पडला असेल की गाय इतकी बुटकी कस काय ? तर अनुवंशिकते मुळेही गाय बुटकी आणि दिसायला सुंदर दिसते. पाय आखूड आणि शेपटी जमिनीला टेकतील अशी लांबी असते . वजन 130 ते 200 किलोपर्यंत असते. पांढरा करडा आणि लालसर ठिपक्यांच्या रंगाची हि गाय आढळते . दुसरा प्रश्न म्हणजे या गाईंचे संगोपन फायदेशीर आहे का? तर ही गाय छोटीशी पुंगनूर गाय पाळण्यासाठी खूप सोयीचे असते. आकार लहान असल्यामुळे गाईंसाठी विशिष्ट प्रकारचा गोठा करण्याची गरज लागत नाही.अगदी आपल्या अंगणात पडवीमध्ये किवा गच्चीवरही सहज पणे ती राहू शकते.
त्यामुळे शहरी भागातही या गायीचं संगोपन केलं जाऊ शकतं. उंची कमी असल्यामुळे संगोपनावर इतका जास्त खर्च येत नाही. आहारही कमी लागतो. उपलब्ध चारामध्येही या गाईचे पालन करता येतं. आता दुसरा प्रश्न असाही तुम्हाला पडला असेल की या गाई च्या दूध उत्पादन किती आहे? तर या गायीचं दूध उत्पादन एक ते दोन लिटर इतकंच आहे. पण औषधी गुणधर्मामुळे या गाईच्या दुधाला महत्व आहे. इतर गाईंच्या तुलनेत पुंगनूर या गाईच्या दुधात फॅटचे प्रमाण जास्त आहे. अनेक आजारानं वर रामबाण उपाय म्हणून गाईचं दूध गुणकारी मानलं जातं.हि या गाईची जमेची बाजू आहे .
हि गाई कुठे मिळते ?
ही गाय तुम्हाला खरेदी करायची असेल तर ती कुठे मिळेल ? तर ही गाय प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये आढळते. याच भागातील पुंगनूर तालुक्याच्या नावानंच गाईला ओळखलं जातं. पण सध्या ही गाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.आंध्र प्रदेशात तिच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. गोदावरी जिल्ह्यातील लिंगमपट्टी येथील गो आश्रमामध्ये या गाईच्या संवर्धनासाठी काम केलं जातंय.येथील गोशाळेत जवळपास 300 पुंगनूर गाई असून त्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. जगातील सर्वात छोटी गाय पाहण्यासाठी देशभरातील लोक आंध्र प्रदेशात येत असतात. शिवाय या गाई खरेदीही करतात. पूर्वीच्या काही शेतकर् यांच्या दावणीला किती गुर. यावरून त्यांची श्रीमंती मोजली जायची .गोठ्यातल्या दावणीला जेवढी गाईंची संख्या जास्त तेवढी त्या घरचं दूधदुप्त ही जास्त मानलं जायचं पूर्वी गोट्याचा देशी गाईंचे प्रमाण जास्त होतं पण काळ बदलत गेला तशी दाऊनीत देशी गाईंची जागा संकरित गाई ने घेतली आणि देशी गाईंची संख्या कमी होत गेली पण आता लोकांना देशी गाईंचे
महत्त्व कळायला लागले. त्यामुळे देशी गो पालनकडे पशुपालकांचा ओढा वाढतोय.