
soybean bajarbhav: शुक्रवारी आठवडा संपत आला असताना लातूर बाजारातील सोयाबीनचे भाव स्थिर राहिले. संपूर्ण आठवड्यात त्यात फारशी घसरण पाहायला मिळाली नाही, उलट शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी लातूरला सरासरी ४२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पाहायला मिळाले.
सोयाबीन हमीभाव केंद्रांना केंद्राने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली, त्यानंतर सोयाबीनचे स्थानिक बाजारातील भाव वाढण्याची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात या निर्णयानंतर आठवडा उलटला तरी भाव वाढले नाही. मात्र ते घसरलेही नाही. टिकून राहिल्याचे जाणवत आहे. लातूर सारख्या काही महत्त्वाच्या बाजारात मात्र सोयाबीन थोडा वधारला आहे. तर इतर बाजारात सोयाबीनचे बाजारभाव हे ४ हजाराच्या आसपास टिकून आहेत.
शुक्रवारी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची ११७२ टन आवक होऊन कमीत कमी बाजारभाव ३७०० रुपये, जास्तीत जास्त ४३१०, तर सरासरी ४१८० रुपये प्रति क्विंटल असे होते. जालना बाजारात सोयाबीला सरासरी ४०२५ रुपये, अमरावती बाजारात ३९०० रुपये, अकोला बाजारात ४१८०, हिंगणघाटला ३८००रुपये असे होते.