
मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे बाजारभाव घसरताना दिसून येत आहेत. दिनांक ८ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात टोमॅटाची सुमारे ८ हजार ६३७ क्विंटल आवक झाली.
या संपूर्ण आठवड्यात दररोज सरासरी १४ ते १४ हजार क्विंटल टोमॅटोची आवक राज्यातील बाजारात होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटोचे बाजारभाव सरासरी ५०० रुपयांच्याही खाली प्रति क्विंटल आल्याचे दिसून येत आहे.
आज दिनांक ९ जानेवारी रोजी पुणे बाजारात २२१३ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. सरासरी ८५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर कमीत कमी ५०० रुपये दर मिळाला. पिंपरी बाजारात टोमॅटोची २० क्विंटल आवक झाली असून सरासरी १४०० रुपये बाजारभाव मिळाला.
दिनांक ८ जानेवारी, गुरूवार रोजी मुंबई बाजारात एक नंबर टोमॅटोची सुमारे २४५९ क्विंटल आवक होऊन सरासरी १४०० रुपयांचा दर मिळाला. पुणे बाजारात १८४९ क्विंटल आवक होऊन सरासरी १०५० तर कमीत कमी ६०० रुपये बाजारभाव मिळाला.
सोलापूर बाजारात सरासरी ५०० रुपये तर कराड बाजारात सरासरी १ हजार रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळाला. साताऱ्यात १२५० तर कोल्हापूरात १ हजार रुपये बाजारभाव मिळाला.