![](https://krishi24.com/wp-content/uploads/2025/02/devendra-fadnvis-1024x768.webp)
Devendra Fadnvis बुधवारी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात उपसा सिंचन योजनेच्या कामाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं गेल्या दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यात होत असलेल्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं .
प्रकृतीच्या कारणामुळे आष्टीतल्या या कार्यक्रमाला आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे हे गैरहजर राहिले पण देवेंद्र फडणवीस त्यांच्याबद्दल काही बोलणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता होती पण हा कार्यक्रम गाजवला तो आमदार सुरेश धस आणि आमदार मंत्री पंकजा मुंडे यांच्या भाषणांनी मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे असं म्हणत सुरेश दसांनी फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं तर त्यांच्या नंतर भाषणाला उभ्या राहिलेल्या पंकजा मुंडेंनी सुद्धा दसांना चांगले स्टोले लगावले पण गेल्या दोन महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या धसांनी या कार्यक्रमात फडणवीसांच्या केलेल्या कौतुकानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं मेरे पास देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे असं धसांनी म्हटल्यामुळे गेल्या दोन महिन्यात यांपासून सुरेश धसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेमागं फडणवीसांचीच अदृश्य शक्ती आहे का असं आता म्हटलं जातंय या चर्चांमागची नेमकी कारणं काय सुरेश धसांच्या माध्यमातनं फडणवीसांनी खरंच काही डाव साधलेत का पाहूयात या लेखामध्ये
सगळ्यात आधी बुधवारी झालेल्या कार्यक्रमात नेमकं कोण काय काय बोललं ते थोडक्यात समजून घेऊयात सुरेश धस यांनी सुरुवातीलाच भाषण करताना मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा लाडका आहे माझ्या भागातल्या सगळी काम देवेंद्र फडणवीस हा बाहुबलीच करू शकतो काही लोक म्हणतात की बीड जिल्ह्याची बदनामी होते पण या बीड जिल्ह्यानं क्रांतिसिंह नाना पाटलांपासून ते गोपीनाथ मुंडेंना निवडून दिले काही ठराविक राजकारण्यांनी बीडमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठिंबा दिला. त्यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली पण संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी कणखर अशी भूमिका घेतली. तुम्ही कोणाला सोडणार नाही यावरती आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे असं सुद्धा धसांनी भर सभेत म्हटलंय तर भाषणाचा शेवट करताना सुरेश धसांनी मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे असा डायलॉग मारलाय .
धसांच्या भाषणानंतर पंकजा मुंडेंनी सुद्धा भाषण करताना सुरेश अण्णा आज फडणवीसांना बाहुबली म्हणतात कधी काळी मला शिवगामिनी म्हणायचे असं म्हणत धसांना चांगला स्टोला लगावला या दोन्ही भाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा भाषण केलं सुरेश धस एकदा मागे लागले की डोकं खाऊन टाकतात सरपंच परिषदेने अनेक अशा मागण्या केल्यात त्यातली एक मागणी सरपंच देशमुख यांच्या हत्याकांडातल्या दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात आहे पण या आधीही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो सरपंच संतोष देशमुख हत्येसारख्या घटना या खपून घेतल्या जाणार नाही प्रत्येक दोषींवरती कारवाई होणारच कोणीही असो त्याला सोडणार नाही अशी ग्वाही फडणवीसांनी त्यांच्या भाषणातनं भर सभेतनं दिली आता या भाषणांमधनं धस आणि मुंड्यांमध्ये झालेली राजकीय टोलेबाजी दिसून येत असली तरी सुरेश धसांनी केलेलं फडणवीसांच कौतुक हा राज्यात चर्चेचा विषय होता राष्ट्रवादीतन भाजपमध्ये आलेले सुरेश धस हे खूपच कमी काळात फडणवीसांचे निकटवर्तीय झाले
बुधवारच्या कार्यक्रमात धसांचं फडणवीसांच्या शेजारी बसणं फडणवीसांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असं म्हणणं यातनं धसांनी अलीकडे घेतलेला आक्रमक पवित्रा हा फडणवीसांच्याच आशीर्वादातनं घेतलाय असं म्हटलं जातंय पण सुरेश धसांना ऍक्टिव्ह करून फडणवीसांनी साधलेल्या डावांची सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा होते त्यातला पहिला डाव दिसतो तो म्हणजे ओबीसी वोट बँक न दुखवता मुंडेंना विरोध करणं आता गेल्या काही वर्षात पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला सुप्त संघर्ष काही लपून राहिला नाहीये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर त्यांना पक्षाने साईडलाईन केल्याच्या चर्चा झाल्या त्यांना गेल्या चार ते पाच वर्षात पक्षाने कुठलीही मोठी जबाबदारी न देता पक्षाने डावल असं बोललं गेलं आणि हे सगळं देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरूनच होतंय अशा चर्चा होत्या पण यामुळे मराठवाड्यातला ओबीसी समाज फडणवीस आणि भाजपवर नाराज झाल्याचं सांगितलं जातं ओबीसी समाजाच्या पाठिंब्यामुळे पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील अशाही वावड्या मध्यंतरी उठल्या होत्या पण 24 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी मराठा आरक्षणाचा भडका उडाला त्यामुळे निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भाजपला माधव पॅटर्न प्रभावी रित्या राबवणं गरजेचं होतं .
त्यासाठी मुंडे समर्थक ओबीसी समाजाला नाराज करणं हे भाजपला परवडणार नव्हतं त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशावरनं पंकजा मुंडेंना बीड लोकसभेचं तिकीट देणं फडणवीसांना भाग पडलं माझं तिकीट राज्याने नाही तर देशाने ठरवलंय पंतप्रधान मोदींनी मला उमेदवारी दिली आहे असं त्यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुद्धा पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी देण्यात केंद्रीय नेतृत्वाचाच वाटा मोठा असल्याचं बोललं गेलं त्यामुळे मुंडेंना डावलून ओबीसी वोट बँक दुखावणं भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला मान्य नाहीये असं दिसून आलं पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धसानी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली केली त्यामुळे मुंडे अडचणीत आले पण धसांनी फक्त धनुभाऊंना टार्गेट न करता पंकजा मुंडेंना सुद्धा बीडचं पालकमंत्रीपद देण्यावरती आक्षेप घेतला .
तसंच त्यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला पंकजा मुंडेंनी माझ्या विरोधात काम केलं त्या आमच्या लोकांना न्याय देऊ शकत नाहीत असं दसांनी थेटपणे सांगत पंकजा मुंडेंना बीडचा पालकमंत्री करू नये अशी भूमिका घेतली झालंही .
तसंच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनाही बीडचं पालकमंत्रीपद मिळालं नाही पंकजांना जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालं त्यामुळे फडणवीसांनी धसांना पुढे करत पंकजा मुंडेंना बीडच्या पालकमंत्री पदापासून लांब ठेवलं असं बोललं जातं त्यामुळेच ओबीसी समाजाला थेटपणे न दुखावता फडणवीसांनी आपल्या मुंडे विरोधाचा डाग यशस्वी केलाय अशा चर्चा होत आहेत धसांच्या माध्यमातनं फडणवीसांनी साधलेली दुसरी गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे मराठा राजकारणातनं एकनाथ शिंदेंना वजा करणं मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात केल्यावर सगळ्यात जास्त टार्गेट फडणवीसांना करण्यात आलं देवेंद्र फडणवीस हे समाजाला आरक्षण मिळवून देणार यातला मोठा अडथळा आहे असं जरांगेनी वारंवार सांगितलं त्यामुळे मराठा समाजात फडणवीसांबद्दल प्रचंड मोठा रोष निर्माण झालेला याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला.
फडणवीसांच्या नेतृत्वात लढणाऱ्या भाजपला मराठवाड्यात व्हाईट वॉश मिळाला पण त्याच वेळी मराठा समाजात निर्माण झालेली स्पेस हेरली ती एकनाथ शिंदे यांनी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं दोन वेळा उपोषण सोडवलं मराठा आरक्षणासाठी आपली भूमिका कशी पूरक आहे हे दाखवून दिलं शिंदे हे स्वतः मराठा समाजात नेतात त्यामुळे मराठा वोट बँकेच्या राजकारणात त्यांनी सरशी केल्याचं सांगितलं गेलं पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तेव्हा फडणवीसांनी हे प्रकरण मोठ्या शिताफेने हाताळलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल या प्रकरणातल्या आरोपींवर मुक्का लावला जाईल असं आश्वासन फडणवीसांनी थेट सभागृहातनं दिलं त्यानुसार देशमुखांच्या मारेकऱ्यांवर मुक्का सुद्धा लावण्यात आला संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फडणवीसांची भेट घेतली तेव्हा सुद्धा फडणवीसांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं इतकंच नाही मराठा आरक्षणावरनं फडणवीसांना धारेवर धरणाऱ्या जराने सुद्धा फडणवीस हे देशमुखांना न्याय मिळवून देतील असा विश्वास व्यक्त केला आता बुधवारी सुरेश धसांनी आष्टीमध्ये भाषण करताना फडणवीसांनी देशमुख हत्या प्रकरणात घेतलेली भूमिका ही सगळ्यांना आवडली आहे तुमच्यावर आमचा विश्वास आहे असं थेटपणे म्हटलंय पण या सगळ्या प्रकरणात एकनाथ शिंदे मात्र कुठेच नसल्याचं दिसून आलंय त्यामुळे एकीकडे धसांच्या माध्यमातनं हे प्रकरण लावून धरत फडणवीसांनी मराठा समाजाचा विश्वास पुन्हा एकदा संपादित केलाय असं म्हटलं जातंय .
या माध्यमातनं फडणवीसांनी साधलेली तिसरी गोष्ट म्हणजे विकास पुरुष ही आपली इमेज पुन्हा इस्टॅब्लिश करणं निवडणुकांच्या आधी मराठवाड्यातल्या मराठा समाजात असलेला रोष पाहता देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मराठवाड्यात फारसे फिरकले सुद्धा नाहीत त्यातल्या त्यात बीडमध्ये तर त्यांनी पाऊलही ठेवलं नाही पण आज तेच फडणवीस शिंपोरा ते खुंटेफळ या योजनेतील बोगद्याच्या कामाचं आणि श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर बांधकामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यात आले आमच्या भागातली सगळी काम देवेंद्र फडणवीस हा बाहुबलीच करू शकतो असं यावेळी भाषणात सुरेश धसांनी म्हटलं त्यामुळे जातीय राजकारणाला बगल देत मराठवाड्याच्या जनतेमध्ये आपली विकास पुरुष ही इमेज ठासवण्याचा फडणवीस प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जातं त्यामुळे जरांगे विरोध मागे पडून एका मराठा आमदाराच्या मतदारसंघात त्यांच्या मार्फत केलेल्या योजनेचे श्रेय घेत फडणवीसांनी आपले विकास पुरुष हीच इमेज पुन्हा एकदा इस्टॅब्लिश केल्याचं चा प्रयत्न केलाय असं म्हटलं जातंय
एकंदरीतच आष्टीतल्या कार्यक्रमाला हजरी लावत फडणवीसांनी आपली विकास पुरुष ही मूळ इमेज बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या मनात नव्याने तयार केली आहे तर सुरेश धसांच्या माध्यमातनं मुंडे विरोध आणि मराठा राजकारण अचूक रित्या साधलं गेलंय अशा चर्चा होतात या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांनी धसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खरंच डाव साधलेत का याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया नक्की कळवा .