devendra Fadnavis Chief Minister : नवे सरकार शेतीसाठी काय करणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले.

devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यात त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी आगामी काळात राज्य सरकार काय कामे करणार याची थोडक्यात माहिती दिली.

महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शेतीसाठी राज्यातील सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतील. त्यात नदी जोड प्रकल्पाचे काम सुरू करण्यावर भर राहील. सन २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या वक्तव्यानंतर जलयुक्त शिवार आणि नदीजोड प्रकल्पांना वेग येणार असे दिसत आहे.

समृद्धी महामार्गामुळे जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढण्यास मदत होत आहे. याच धर्तीवर शक्तीपीठ मार्गासाठी संबंधित भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *