Kanda bajarbhav : होळी आणि त्यानंतर आलेल्या धुलिवंदनाच्या सुटीमुळे राज्यातील बाजारसमित्यांमध्ये कांदा आवक घटलेली दिसून आली. दरम्यान महाराष्ट्रातील कांदा बाजारात मागील दोन दिवसांमध्ये किंमतीत काही प्रमाणात चढ-उतार झाले आहेत. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सोलापूर आणि पुणे बाजारसमित्यांमध्ये कांद्याची आवक आणि दर यामध्ये लक्षणीय बदल दिसून आले.
लासलगाव येथे १३ मार्च रोजी म्हणजेच होळीच्या दिवशी कांद्याची सरासरी किंमत १४७५ रुपये प्रति क्विंटल होती, तर १४ मार्च रोजी ती किंचित वाढून १५५० रुपये प्रति क्विंटल झाली. कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर अनुक्रमे १०२० आणि १९०० रुपये होते. आवकेमध्येही बदल दिसून आला असून मागील दिवशीच्या तुलनेत किंचित घट झाली.
पिंपळगाव बसवंत येथे १३ मार्च रोजी कांद्याची सरासरी किंमत १४५१ रुपये होती, जी १४ मार्च रोजी १५०० रुपयांपर्यंत वाढली. कमीत कमी दर ६५० रुपयांवरून ६०० रुपयांपर्यंत खाली गेला, तर जास्तीत जास्त दर १७५२ वरून १८५१ रुपयांपर्यंत वाढला.
सोलापूर बाजारात १३ मार्च रोजी कांद्याचा सरासरी दर ११०० रुपये होता, तर १४ मार्च रोजी तो स्थिर राहिला. मात्र, १४ मार्च रोजी जास्तीत जास्त दर २२६० रुपयांवरून १७०० रुपयांपर्यंत खाली आला. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरावर परिणाम झाल्याचे दिसून आले. पुणे बाजारात १३ मार्च रोजी कांद्याचा सरासरी दर ११५० रुपये होता, तर १४ मार्च रोजी तो वाढून १३०० रुपये झाला. जास्तीत जास्त दर १८०० रुपये नोंदवला गेला. आवक कमी झाल्यामुळे किंमतीत वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावा?
दरम्यान मागील आठवड्यापासून उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने राज्यातील कांदा आवक वाढून भाव कमी झाले होते. सध्याचे बाजारभाव दोन हजारांच्याही खाली आले असून ते आणखी खाली येण्याची शक्यता आहे. मात्र होळीच्या दोन दिवसांच्या सुटीनंतर बाजारभाव घसरणीला आणि कांदा आवकेला लगाम बसला, परिणामी बाजारभाव टिकून राहिलेच शिवाय वाढलेही. मात्र सुटी संपल्यानंतर आणि रविवारच्या पुन्हा येणाऱ्या सुटीनंतर आगामी काळात कांदा आवक घटणार असून किंमतीही स्थिर राहू शकतात मात्र त्यानंतर पुन्हा पुढच्या आठवड्यात सोमवारपासून आवक वाढण्याची शक्यता असून त्याचा किंमतींवर विपरित परिणाम होऊ शकतो. दरम्यान शेतकऱ्यांनी बाजारातील बदलांचा विचार करून योग्य वेळी विक्री करावी. लासलगाव आणि पिंपळगाव येथे दर वाढताना दिसत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा विकण्यापूर्वी भावाची स्थिती तपासणे गरजेचे आहे. तसेच, वाढीव दर टिकून राहतात का, याकडेही लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरेल, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी दिला आहे.












