रासायनिक खतांच्या किंमती या कारणामुळे वाढणार ? पहा सविस्तर ..

रासायनिक खतांच्या किंमती या कारणामुळे वाढणार पहा सविस्तर ..

मागच्या वर्षी भारताला मोठ्या प्रमाणात डाय –  अमोनियम फॉस्फेट डीएपी खत रशियन कंपन्यांकडून येत होते. मात्र या वर्षीपासून रशियन कंपन्यांनी बाजारभावाप्रमाणे खते देण्याचा निर्णय घेतला आहे. डीपी सारखी खते भारताला सवलतीच्या दरात मिळणे बंद झाल्याने खतांच्या किमती वाढ होण्याची शक्यता आहे.

यामुळे पुन्हा शेतकरी संकटात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  पावसाने खंड दिल्यामुळे पिकांना फटका बसत आहे.  अशातच खतांच्या किमती वाढल्यास शेतकरी संकटात अडचणीत येऊ शकतो.

जागतिक स्तरावर खतांचा पुरवठा करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याने रशियन कंपन्यांकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.  बाजारपेठेतील किमती प्रमाणे खतांचा पुरवठा करण्याची भूमिका रशियन कंपन्यांनी घेतली , यामुळे भारतात खतांच्या किमती तसेच खतांवरील अनुदानात वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

जागतिक स्तरावरील वाढत्या किमतीमुळे चीननेही खतांची निर्यात कमी केली असल्याची माहिती समोर आली आहे, खते निर्मिती करणाऱ्या एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भविष्यात रशियन खत निर्मिती कंपन्यांकडून सवलतीच्या दरात खते मिळणे अशक्य आहे .

2022 – 23 या वित्तीय वर्षांमध्ये भारताने रशियाकडून 4.35 टन खते आयात केली.  या आयतीचे प्रमाण 246 टक्के वाढले होते . गेल्या वर्षी रशियाने आपल्या खतांची मोठ्या प्रमाणात विक्री केली.  त्यामुळे खतांच्या निर्यातीमध्ये इजिप्त, चीन ,जॉर्डन,   संयुक्त अरब अमिराती या देशांचा वाटा कमी झाला होता. रशियन कंपन्या प्रति टनाला 6631.64 इतकी सवलत देत होत्या.

परंतु आता ते टनाला 425 रुपये ही द्यायला तयार नसल्याची माहिती एका भारतीय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.  रशियन डीएपी ची सध्याची किंमत भारतीय खरेदीदारांसाठी किंमत आणि मालवाहतूक (CFR) आधारावर प्रति टन अंदाजे ४७ हजार २६१ इतकी आहे.  यामध्ये भारताला विशेष सवलत मिळत होती.  आता रशियन कंपन्यांनी सवलत देण्यास नकार दिला आहे. 

दरम्यान कृषी सेवा चालक सुनील लडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षभरात डीएपी चे दर स्थिर आहेत . परंतु भारताला पुरवठा करणाऱ्या रशियन कंपन्यांनी बाजारभावाप्रमाणे खते देण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे भविष्यात खतांची किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.  सध्या काही खतांच्या किमतीत किरकोळ घट झाले ची माहिती लडे यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *