पी एम किसान योजनेचे एकूण 14 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले असून आता पंधराव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. मात्र 15 वा हप्ता तुमच्या खात्यावर येणार की नाही हे तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील सोपी पद्धत वापरा.
15 हप्त्याचा लाभ मिळेल की नाही? यासाठी तुम्हाला तुमच्या स्टेटस मधील मेसेज तपासावा लागेल . मेसेज तपासण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला अधिकृत शेतकरी पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगिन व्हावे लागेल.
या वेबसाईटवर तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस हा पर्याय दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करावे.
त्यानंतर तुम्हाला योजनेचा नोंदणी क्रमांक किंवा दहा अंकी मोबाईल नंबर टाकावा लागेल .
आता तुम्हाला स्क्रीनवर कॅप्चा कोड दिसेल तो भरला की सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल.
तुमच्या स्टेटस च्या समोर ई केवायसी पात्रता आणि लँड सीडींग च्या समोर लिहिलेला एक मेसेज दिसेल.
या तिघांच्याही पुढे यस लिहिलेले असल्यास तुम्हाला पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळेल परंतु नाही लिहिलेले असल्यास तुम्हाला पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यासाठी पुन्हा ई केवायसी करावी लागेल.
ई केवायसी कशी करतात.
http://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
आता किसान कॉर्नर ई केवायसी लिंक दिसेल त्यावर क्लिक करावे.
त्यानंतर येथे विचारलेली आवश्यक माहिती टाकावी.
त्यानंतर सबमिट या ऑप्शन वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण होईल.
याप्रमाणे तुमची स्थिती तपासा
सर्वात अगोदर pmkisan.gov.com या वेबसाईटवर जा.
आता फार्मर्स कॉर्नर या ऑप्शन वर क्लिक करावे .
त्यानंतर लाभार्थी स्थितीवर क्लिक करावे.
आता तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा ,ब्लॉक आणि गावाचे नाव टाका.
त्यानंतर get report या ऑप्शन वर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी उघडेल.
शेतकरी या यादीमध्ये तुम्ही तुमच्या हप्त्याचे तपशील पाहू शकता.