मराठवाड्यात , मध्य महराष्ट्रात ,जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट ,पहा हवामान अंदाज ..

मराठवाड्यात , मध्य महराष्ट्रात ,जोरदार पावसाचा 'येलो अलर्ट पहा हवामान अंदाज ..

मान्सून ने परतीचा प्रवास सुरू केल्याचे सोमवारी हवामान विभागाने जाहीर केले आहे.  पुढील दोन ते तीन दिवसात वायव्य आणि लगतच्या पश्चिम भागातील आणखीन काही भागातून मान्सून माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.  त्यामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. 

राज्यातील कोकण, मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली.  मंगळवारी संपूर्ण मराठवाड्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. 

राज्यामध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस

तसेच कोकणमध्ये व मध्य महाराष्ट्रात 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान विजांच्या गडगडासह काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.हवामान विभागा ने विभागाने आज विदर्भातील यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, गडचिरोली, अमरावती, जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे . तर मराठवाडा छत्रपती, संभाजीनगर, जालना बीड, धाराशिव, परभणी, नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात  जोरदार पावसाचे येलो अलर्ट जारी केला आहे.

तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक, अहमदनगर ,कोल्हापूर, पुणे ,सातारा, सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.  त्यासोबतच कोकणातील मुंबई, सिंधुदुर्ग ,रत्नागिरी, रायगड ,पालघर ,जिल्हा खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार, जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.  तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

राज्यात बुधवारी संपूर्ण कोकण मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज आहे.  सोमवारपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.  राजस्थानमधील नौखरा,जोधपूर ,  बारमेर पर्यंतच्या माघार घेतली आहे.

दरवेळी राजस्थान मधून परतीचा मान्सून 17 सप्टेंबर पासून सुरू होतो परंतु या वर्षी आठ दिवस उशिराने हा प्रवास सुरू झाला आहे.  दरम्यान मान्सूनचा प्रवास सुरू झाला असला तरी राज्यत अद्यापही मान्सून सक्रिय आहे.  महाराष्ट्रातून पाच ऑक्टोंबर पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  धुळे नंदुरबार जिल्हा वगळता सर्वत्र येल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे . कोकण विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील जलसाठही वाढला आहे.

Leave a Reply