काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम, तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा, पहा हवामान अंदाज…

काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा पहा आजचा हवामान अंदाज

राज्याच्या बहुतांश भागात आज पावसाचा जोर कमीच होता. तर अनेक भागात पावसाची उघडीप कायम होती. काही भागामध्ये जोरदार पाऊस झाला पण या पावसाचा स्वरूप मात्र सर्वत्र नव्हतं. आज हवामानशास्त्र विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे मग नेमका कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार ते आपण पाहूया .

कमी दाबाच्या पट्ट्याचा बोरवेल टोक उत्तरेकडे सरकले आहे. हा कमीदाबाचा पट्टा आपल्या सामान्य स्थितीत आहे तर मान्सूनचा असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची पूर्वेकडील टोक आपल्या सामान्य स्थितीत आहे. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा गंगानगर गड आणि सिद्धी आणि बंगालच्याउपसागराच्या पूर्व मध्य भागात आग्नेयेकडे ,बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य कडे आणि शेजारच्या उत्तर भागात कमी चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या चक्राकार वाऱ्यांची स्थिती नैऋत्य भागात आणि शेजारच्या पश्चिम बंगालच्या भागात तसेच झारखंड कडे पुढील दोन ते तीन दिवसां मध्ये सरकण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात 18 जुलै पर्यंत चक्राकारवाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे . दक्षिण गुजरात याभागात ५. ८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्याच्या काही भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली तर बहुतांश भागांमध्ये हलक्‍या पावसाने हजेरी लावली आहे आज कोकण मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भातील भागांमध्ये पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला . आज बऱ्याच भागांमध्ये पुरेसा पाऊस नाही .

हवामान शास्त्र विभागाने आज ही राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला . आज कोकण,मध्यमहाराष्ट्र ,मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला .कोकणातील ,रत्नागिरी , सिंधुदुर्ग , मुंबई , रायगड,पालघर , आणि ठाणे, या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

सातारा, नगर, पुणे, या जिल्ह्यात ठीक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, बीड ,जालना, लातूर, नांदेड ,परभणी, आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.ठीक ठिकाणी विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती, वाशिम, नागपूर ,गडचिरोली, भंडारा ,गोंदिया, आणि चंद्रपूर, जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस यलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *