महिंद्राने केला एसबीआयशी करार; मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार कर्ज

कृषी यांत्रिकीकरणासाठी अग्रणी असलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने एसबीआय बँकेसोबत कृषी अवजारांसाठी सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नुकताच करार केला आहे.

राज्यातील शेतकरी कृषी यांत्रिकीकरणासाठी कर्ज (Agriculture Mechanization Loan) मिळवण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवत असतात. परंतु कृषी यंत्रासाठी सहजतेने कर्ज मंजूर होत नाही. मंजूर झाले तर व्याजदर अव्वाच्या सव्वा असतात. शेवटी शेतकऱ्यांचा हिरमोड होतो. कृषी यांत्रिकीकरणाला (Agriculture Mechanization) चालना मिळत नाही

अलीकडेच कृषी यांत्रिकीकरणासाठी अग्रणी असलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने (Mahindra & Mahindra Company) एसबीआय बँकेसोबत (SBI Bank) कृषी अवजारांसाठी सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नुकताच करार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी अवजारांची खरेदी करण्यास मदत होईल, असा कंपनीचा दावा आहे.

मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांसाठी एसबीआय कृषी अवजारांसाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही एसबीआयसह इतर बँकांनी पुढाकार घ्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा देशातील सर्वात मोठी ट्रॅक्टर निर्मिती कंपनी आहे. एसबीआय या बँकेबरोबर करार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि कृषी अवजारे खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या महिंद्रा ट्रॅक्टर वितरकाकडे किंवा एसबीआयच्या शाखेत जाऊन अर्ज प्रकिया पूर्ण करून टॅक्टर व कृषी अवजारांवर कर्ज घेऊ शकतात. या प्रक्रियेत केवायसी करून घेणे बंधनकारक आहे. तसेच उत्पन्नाचे आणि स्थावर मालमतेचे कागदपत्र जमा करणेही अनिवार्य आहे.

“देशातील शेतकऱ्यांच्या शेती मशागतीमध्ये सुलभता आणून त्यांना सक्षम करण्यासाठी कृषी अवजारांसाठी कर्ज आपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरणार आहे. महिंद्रा सध्या मध्यप्रदेशमधील एसबीआयशी यासाठी करार केला आहे.

देशातील शेतकऱ्यांना अडचणीतून मुक्त करणे आणि कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देशातील कृषी क्षेत्राला उभारी देण्याचा आमचा उद्देश आहे.” असे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे कृषी अवजारे विभागाचे प्रमुख हेमंत सिक्का म्हणाले.

एसबीआय देशातील सर्वात मोठे बँकिंग जाळे असणारी बँक आहे. कृषी क्षेत्रसाठी एसबीआयचा कर्ज पोर्टफोलियो २ लाख ४५ हजार कोटी रुपयांचा आहे. त्यातून एसबीआय १ कोटी शेतकऱ्यांशी जोडले गेले आहे.

तसेच एसबीआयचे १५ हजार ग्रामीण आणि निम्न शहरी शाखा आहेत. एसबीआय
ट्रॅक्टर, कंबाईन हार्वेस्टर, पावर टिलर आणि इतर कृषी अवजारे खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देत असते.

शेतकऱ्यांच्या उत्पादनासोबतच देशातील औद्योगिकीकरणाला चालना देण्याची आमची भूमिका आहे. देशातील शेतकऱ्यांनी सर्वोत्तम कृषी अवजारे खरेदीसाठी सहज आणि सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे एसबीआयचा उद्देश आहे.

महिंद्रासोबत करार करून आम्ही देशातील सर्वात मोठ्या नेटवर्क असलेल्या कंपनीशी जोडलो गेलो आहोत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदी करण्यात अडचणी येणार नाहीत.” असे एसबीआयचे सीनियर जनरल मॅनेजर शांतनु पेंडसे म्हणाले.

दरम्यान, १९६३ साली महिंद्रा अँड महिंद्राने देशात पहिला ट्रॅक्टर लॉच केला होता. त्यानंतर आजपर्यंत ३० लाख ट्रॅक्टरची विक्री महिंद्राने केली आहे. अधिक मजबूत आणि गुणवत्तापूर्ण ट्रॅक्टरसाठी शेतकरी महिंद्राला पसंती देत असतात.

source:- agrowon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *