सेंद्रीय पद्धतीची कमाल, सोलापूरच्या शेतकऱ्यानं घेतलं गव्हाचं विक्रमी उत्पादन,

रोज निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना करत शेती करणे हे शेतकऱ्यांपुढील मोठं आव्हान आहे. हे आव्हान पेलायचं असेल तर योग्य नियोजन आणि अभ्यास आवश्यक आहे. सेंद्रीय शेतीचा पर्याय वापरला तर आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील गव्हाची देखील निर्यात होऊ शकते,असं वृत्त  आम्ही यापूर्वी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताला दुजोरा देणारी घटना आता समोर आली आहे.

माळशिरस तालुक्यातील दसूर गावातील शेतकरी सुभाष कागदे यांनी एकरी 25 क्विंटल इतकं विक्रमी गव्हाचं उत्पादन घेतलं आहे. कागदे यांच्या शेतात यापूर्वी एकरी 12 ते 15 एकर गव्हाचं उत्पादन निघत होतं. पण, डॉ. सलीम चन्नीवाला यांनी निर्माण केलेल्या जनम चरखा खतामधून त्यांच्या शेतीमधील उत्पादनात वाढ झाली आहे.

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा सोलापूर जिल्ह्यातील 104 गावांना फटका बसला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीही या शेतकऱ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागले. पण, कागदे यांनी पावसाचं चिन्ह दिसताच काळजी घेतली. त्यांनी वेळेच्या एक दिवस आगोदरच मशिनचा वापर करत गव्हाचे पिक काढून घेतले.या तत्परतेचा त्यांना फायदा झाला आहे.

‘जैनम चरखा आणि क्रांती ॲग्रोटेक या सेंद्रिय खताची आम्ही बाजारात विक्री केली. कागदे यांनी आम्ही दिलेले सर्व गाईडलाईन्स फॉलो केल्या. त्याचा त्यांना फायदा झाला असून त्यांना विक्रमी उत्पादन मिळाले. हा सेंद्रीय गहू असल्याची आम्हाला खात्री आहे. आमच्या मार्गदर्शानातून निर्माण झालेल्या प्रॉडक्टचे हे उत्तम उदाहरण आहे,’ असं मत जैनम चरखाचे संचालक अनिल कुमार जैन यांनी व्यक्त केले.

source:-lokmat

 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *