नमस्कार शेतकरी बंधुंनो आज आपण या ठिकाणी PVC पाईप लाईन अनुदान योजना या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कोठे करायचा याची माहिती खालील लेखात दिलेली आहे. पाईप लाईन अनुदान योजना सोबतच विविध शासकीय योजनांचे अर्ज शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर भरू शकतात. जसे कि ट्रॅक्टर योजना, रोटाव्हेटर योजना, कल्टीव्हेटर योजना, ठिबक सिंचन अनुदान योजना, तुषार सिंचन अनुदान योजना इतरही योजनेसाठी शेतकरी अर्ज करू शकतात.
PVC पाईप लाईन अनुदान योजना साठी ऑनलाईन अर्ज
1.तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये mahadbt farmer हा कीवर्ड टाइप करा, त्यानंतर इंटर करा.
2.त्यानंतर mahadbt या वेबसाईटची लिंक तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा.
3.जसे तुम्ही या लिंकवर क्लिक कराल त्यावेळी mahadbt या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल.
4.या ठिकाणी वापरकर्ता आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन करा.
तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड नसेल तर mahadbt साठी नोंदणी कशी करावी या याची संपूर्ण
माहिती साठी येथे टच करा.
1.लोगिन केल्यावर याठिकाणी तुम्हाला तुमचा dashboard दिसेल.
2.अर्ज करा अशी एक निळ्या रंगाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
3.योजनेसंबधी सूचना दिसेल ती सविस्तरपाणे वाचून घ्या.
4.मेनू या बटनावर क्लिक करा.
5.सिंचन साधने व सुविधा या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
6.तालुका गाव सर्वे क्रमांक इत्यादी माहिती टाका.
7.घटक या पर्यायासाठी पाईप्स हा पर्याय निवडा
8.उपघटक या ठिकाणी अनेक पर्याय तुम्हाला दिसतील यापैकी pvc pipe हा पर्य्याय निवडा.
9.पाईपची लांबी टाका.
10.अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
11.पहा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
12.योजनांना प्राधान्य द्या.
13.अर्ज सादर करा बटनावर क्लिक करा.
14.पेमेंट करा.
15.पेमेंट पावती व अर्ज केल्याची पावती प्रिंट करा अथवा डाउनलोड करा.
16.अर्जाची स्थिती बघण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा.
source:- yojanakamachi