Unhali Kanda Bhazarbhav : उन्हाळी कांद्याचा आठवडाभर कसा राहिला ट्रेंड; भाव वाढले की कमी झाले, घ्या जाणून…

Unhali Kanda Bhazarbhav : आज सोमवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याचे सरासरी प्रति क्विंटल दर १२०० रुपये असे आहेत. शनिवारच्या तुलनेत त्यात ४० रुपये प्रति क्विंटल घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात सोमवारी बाजार सुरू झाले तेव्हा लासलगावला कांद्याचे बाजारभाव सरासरी १२८० रुपये होते. त्यानंतर संपूर्ण आठवडा या दरात […]
Ginger prices : यंदा अद्रकचे दर कसे? ठेवावे कि विकावे, वाचा सविस्तर…

देशभरात यंदा आले (अद्रक) उत्पादनात मोठी वाढ झाली आहे आणि त्याचा थेट परिणाम बाजारभावांवर दिसत आहे. १ ते २८ एप्रिल २०२५ दरम्यान देशात एकूण ४०,०६८.२५ टन आले बाजारात दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०२४ च्या याच कालावधीत ही आवक २४,२९५.३० टन इतकी होती. यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ६५ टक्क्यांनी आलेची आवक वाढली आहे. […]
maharashra weather : महाराष्ट्रात पुढील आठवडाभर उष्णतेची लाट नाही; कसे असेल हवामान?

maharashra weather : मुंबई आणि कोकण भाग वगळता महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण जाणवत आहे आणि हे चित्र शनिवार, ३ मे २०२५ पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र पावसाच्या फारशा शक्यता नाहीत, असे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी आपल्या अंदाजात सांगितले आहे. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दुपारी कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस […]