Gas cylinder insurance : शेतकरी बांधवानो; गॅस सिलेंडरवर ५० लाखांचा विमा असतो, हे माहीत आहे का?

Gas cylinder insurance : शेतकरी बांधवांनो ही माहिती तुमच्यासाठी मोलाची असून शक्य झाल्यास परिचितांना फॉरवर्ड करा. आपल्या घरी जेवण बनवण्यासाठी वापरला जाणारा एलपीजी गॅस सिलेंडर आपल्या जीवासाठी घातक ठरू शकतो, हे आपण अनेकदा ऐकतो. काही वेळा सिलेंडरचा स्फोट होतो आणि त्यामुळे जीवितहानी किंवा घराचे नुकसान होते. पण बहुतांश लोकांना हे माहितच नसते की, सरकारी एलपीजी […]
agricultural exports : भारत-पाकिस्तान तणावाचा शेतमाल निर्यातीवर कसा परिणाम होणार..

agricultural exports : भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव केवळ दोन्ही देशांच्या सुरक्षा आणि राजकारणावरच नाही, तर संपूर्ण आशिया खंडातील अन्नसुरक्षेवरही गंभीर परिणाम घडवू शकतो. विशेषतः तांदूळ, कांदा, गहू आणि इतर शेतमालाच्या निर्यातीवर याचा थेट परिणाम होत आहे. भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव केवळ दोन्ही देशांच्या सुरक्षेवरच नाही, तर संपूर्ण आशिया खंडातील अन्नसुरक्षेवरही गंभीर परिणाम घडवू शकतो. या […]
Private market committees : खासगी बाजारसमित्या सरकारच्या रडारवर; आणणार कठोर निर्बंध…

Private market committees : मध्यंतरी नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील रामेश्वर कृषी मार्केट या खासगी बाजारातील व्यापाऱ्यांनी कांदा उत्पादकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची शेतकऱ्यांची तक्रार होती. अशाच तक्रारी राज्यातील अनेक खासगी बाजार आणि व्यापाऱ्यांबद्दल शेतकऱ्यांकडून येत आहे. या पार्श्वभूमीवर या खासगी बाजारसमित्या आता राज्य सरकारच्या रडावर आल्या असून त्यांच्यावर कारवाई होणार आहे. राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी […]
Crop care : अवकाळीच्या पार्श्वभूमीवर ऊस, हळद आणि फळपिकांची अशी घ्या काळजी..

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून मिळालेल्या अंदाजानुसार मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत तूरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञ समितीने शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला जारी केला आहे. हळद आणि ऊसाची अशी घ्या काळजी: सध्या ऊस पिकात पांढऱ्या माशीचा […]
Fisheries : राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला मिळाला कृषी दर्जा, कर्जाच्या सुविधा मिळणार…

Fisheries : राज्यातील मच्छिमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने आणि पुढाकाराने मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा शासन निर्णय तातडीने जारी करण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील मच्छिमार व्यावसायिकांना […]
food supply : देशात पुरेसा अन्नसाठा, युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील साठेबाजांवर कारवाई..

food supply : केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देशात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नसल्याचे स्पष्ट केले आहे. “मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की सध्या आपल्याकडे नियमित गरजेपेक्षा कितीतरी पट जास्त साठा आहे – मग तो तांदूळ, गहू असो किंवा चणा, तूर, मसूर किंवा मूग यासारख्या […]
state of rain : तापमानात चढ-उतार; राज्यात पावसाची शक्यता..

state of rain : मागील २४ तासांत देशात विविध भागांमध्ये हवामानात बदल दिसून आले. उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण-गोवा परिसरातही तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. पुणे, महाबळेश्वर, औरंगाबादसारख्या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलका पाऊस झाला. दरम्यान ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे […]
Kanda Rate : तर पुढील आठवड्यात लासलगाव, पिंपळगावला कांदा दर हजाराच्या खाली जाणार?

kanda bajarbhav : अवकाळी पाऊस, गारपीट यांच्यामुळे या आठवड्यात शेतकऱ्यांनी कांदा मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणल्याने त्याचा परिणाम भाव मिळण्यावर झाला. मागच्या आठवड्यात शनिवारपर्यंत लासलगाव बाजारात काहीसे १२०० रुपयांपर्यंत पोहोचलेले कांदा बाजारभाव या आठवड्यात कमी होऊन थेट हजाराच्या आसपास आले आहेत. मागील संपूर्ण आठवडयात राज्यात दररोज सरासरी साडेतीन लाख क्विंटल आवक होत होती आणि परिणामी […]