कोकणात पावसाचा जोर वाढला,विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी पहा सविस्तर …

कोकणात पावसाचा जोर वाढला,विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी पहा सविस्तर ...

ओसरलेल्या पावसाने गेल्या काही दिवसापासून पुन्हा पडण्यास सुरुवात केली आहे कोकणात पावसाचा जोर वाढला आहे तसेच विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे राज्याच्या विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे या पावसामुळे रोपांना काहीसा दिलासा मिळालेला आहे

सिंधुदुर्ग मध्ये बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे गुरुवारी पहाटे देखील पावसाचा जोर वाढल्याचे चित्र तिथे दिसले आहे. यामुळे शेतीच्या कामांना पुन्हा वेग आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पालघर रत्नागिरी रायगड जिल्ह्यात तूरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत.

पश्चिम विदर्भात अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात 24 तास सर्व दूर पाऊस पडला आहे .बुलढाणा जिल्ह्यात शेगाव, जवळा मंडळात, खामगाव, तालुक्यातील पळशी, बुद्रुक ,पिंपरी, गवळी, मंडळात, अकोला, जिल्ह्यातील राजदा, कापशी, व्याळा, बार्शीटाकळी ,मध्ये अतिवृष्टी झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.

तसेच मराठवाड्यात देखील ढगांची गर्दी झाली असून ,तुरळ ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या आहेत.

जालना ,बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात तसेच छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळलेल्या आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड सोयगाव सह सिल्लोड तालुक्यातील काही मंडळात पावसाचा जोर अधिक आहे.

जालना जिल्ह्यातील जाफराबाद व भोकरदन या तालुक्यातही जोरदार सरी कोसळल्या बीड जिल्ह्यामधील आंबेजोगाई व केज मधील काही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. लातूर जिल्ह्यामध्ये रेनापुर सह अहमदपूर तालुक्यातील काही मंडळांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. गुरुवारी दुपारनंतर जालना जिल्ह्यातील राजूर ला जोरदार पावसाची सुरुवात झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *