शेतीमध्ये कष्ट जास्त आणि फायदा कमी यामुळे लोक शहरातील नोकरीकडे धाव घेतात .खाजगी नोकरी करण्यासाठी लोक रांगेत उभे राहतात. आता अशाच दोन भावांविषयी आपण पाहणार आहोत. ज्यांनी शेतीसाठी आपली नोकरी सोडली. आता हे दोन्ही भाऊ फुल, फळे ,आणि भाजीपाल्याची नर्सरी लावतात. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. नर्सरीचा व्यवसाय सुरू केल्यापासून या दोन्ही भावांना उत्पन्न हे दुप्पट झाले आहे. व इतर युवकांसाठी हे दोघे प्रेरणा स्थान झाले आहे.
जमीन घेतली भाड्याने
राजस्थान मधील करोली जिल्ह्यामध्ये हे दोन्ही भाऊ राहतात. एकाचे नाव सुरजन सिंग व दुसऱ्याचे नाव मोहर सिंग असे आहे. हे दोघे अगोदर खाजगी शाळेत नोकरी करत होते. यातूनच त्यांचा घर खर्चही भागत नव्हता ,त्यामुळे दोघांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतला. व त्यांना नर्सरी चा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. परंतु त्यांच्याकडे जमीन नव्हती. त्यामुळे त्यांनी भाड्याने जमीन घेऊन नर्सरीचा व्यवसाय सुरू केला .व या व्यवसायातूनच उत्पन्न मिळवले.
एका रोपाची किंमत वीस रुपयांपासून बाराशे रुपयांपर्यंत .
मोहन सिंग म्हणतात की नर्सरीत वेगवेगळ्या प्रकारची रोपे मिळतात. काही रोप ते कोलकत्त्यावरून आणतात . तसेच देशी रोप स्वतः नर्सरी मध्ये ते तयार करतात. आता त्यांच्या नर्सरी मध्ये वीस रुपयांपासून बाराशे रुपये पर्यंत रोपे उपलब्ध आहेत.