लम्पी या आजारामुळे मृत झालेल्या जनावरांच्या शेतकरी पशुपालकांना अर्थसाह्य देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे . जे शेतकरी पशुपालकांना ही मदत मिळालेली नाही ,त्यांना लवकरात लवकर ही मदत देण्यात येईल असे आश्वासन पशुसंवर्धन व दूध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेमध्ये दिले.
विधानसभे मध्ये अमित देशमुख ,नाना पडोळे ,हरिभाऊ बागडे, यांनी राज्यात लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या जनावरांच्या पालकांना अर्थसहाय्य न मिळाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केलादेशातील महाराष्ट्र एकमेव असे राज्य आहे की लम्पी मुळे दगावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना अर्थसाह्य केले जात आहे.
पशुधनांचा मृत्यू दर कमी राहावा यासाठी प्रयत्न.
पशुधनाचा मृत्युदर कमी राहिल यासाठी राज्य सरकार उपाययोजना करत आहे. केंद्र सरकारशी लसीकरणाबाबत करार करण्यात आला असून, पुण्यामध्ये लस निर्मिती सुरू आहे . यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांची संख्या वाढवण्यात येत आहे . ही भरती प्रक्रिया सुद्धा अंतिम टप्प्यात असून लवकरच डॉक्टरची नियुक्ती करण्यात येईल. तसेच लस निर्मितीनंतर राज्याबरोबर देशाला शंभर टक्के राज्य सरकार लस पुरवेल अशी माहिती विखे पाटील यांनी दिली आहे
अशी दिली जात आहे मदत.
दुभत्या जनावरांच्या पशुपालकांना 30 हजार रुपये ,ओढ काम करणाऱ्या जनावरांच्या पशुपालकांना 25 हजार रुपये, तसेच वासरांच्या पशुपालकांना 16 हजार रुपये अशी मदत दिली जात आहे . या मदतीत वाढ करावी अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे . याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल असे श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.