नेपाळमधून टोमॅटो आयातीचा निर्णय; भाववाढीचा केंद्राने घेतला धसका…

नेपाळमधून टोमॅटो आयातीचा निर्णय; भाववाढीचा केंद्राने घेतला धसका

देशभरात झालेल्या टोमॅटोच्या दरवाढीचा केंद्र सरकारने धसका घेत नेपाळमधून टोमॅटो आयतीचा निर्णय घेतला आहे. टोमॅटोची ही आयात 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत राहणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने चार ऑगस्ट रोजी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.

सध्या बाजारपेठेमध्ये टोमॅटोचा घाऊक दर 700 ते 1100 रुपये असून किरकोळ बाजारात प्रति किलोचा दर 150 ते 160 रुपयांच्या आसपास आहे. आवक वाढल्यास टोमॅटोचे भाव कमी होतील व याचाच आर्थिक फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

केंद्राच्या या निर्णयामुळे नेपाळमधील टोमॅटो ची  प्रत्यक्ष होणारी आयात किती लवकर आणि किती प्रमाणात होणार त्यानुसार दर पातळीवर परिणाम होऊ शकतो.  अशी माहिती कृषी व पणन विभागातील सूत्रांनी दिली आहे.  भारतात टोमॅटो ची आयात नेपाळमधून करण्याच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिली आहे. 

तसेच आयात करताना तेथील कीड रोगमुक्त टोमॅटोच्या आयतीवर लक्ष केंद्रित करण्याबाबत, फरीदाबाद हरियाणा येथील वनस्पती संरक्षण सल्लागार यांना दिलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आलेली आहे.  त्यामुळे प्रत्यक्षात आयात टोमॅटोची आवक वाढल्यानंतरच बाजारातील दरावर परिणाम संभवू शकतो असे सांगण्यात आले आहे.

राज्यात 41 हजार हेक्टरवर टोमॅटो लागवड

राज्य मध्ये खरीप हंगामात सरासरी 41 हजार हेक्टर व टोमॅटोची लागवड केली जाते तसेच प्रति हेक्टरी उत्पादकता 20.83 मॅट्रिक टना इतकी राहते . परंतु राज्यामध्ये टोमॅटो लागवड झाली असली तरी पिक येण्यास आणखीन अवधी लागणार असल्याची माहिती कृषी आयुक्ताच्या फलोत्पादक विभागातून देण्यात आली आहे. 

स्थानिक बाजारात महिना अखेरीस टोमॅटो आवक वाढेल. 

पुणे बाजारपेठेत  जून महिना अखेरीस टोमॅटोचा दर दहा किलोस चाळीस ते पन्नास रुपये होता तर किरकोळ विक्री किलोस आठ ते दहा रुपयांच्या आसपास होता.  त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार भाव नसल्यामुळे अक्षरशः टोमॅटो फेकून दिले होते, मात्र सध्या घाऊक बाजारामध्ये टोमॅटोच्या दहा किलोचे कॅरेटला घाऊक दर 700 ते अकराशे रुपये असून किरकोळ बाजार मध्ये प्रति किलोचा दर दीडशे ते 160 रुपयाच्या आसपास आहे.  शेतकऱ्यांनी जादा दरामुळे टोमॅटो ची लागवड केली आहे.  मात्र पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे ऑगस्ट  महिना अखेरीस टोमॅटोची आवक वाढण्यास सुरुवात होईल तोपर्यंत टोमॅटोचे दर तेजीत स्थिराववण्याची अपेक्षा असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *